अवयवदान करणाऱ्यांची संख्या दुप्पट
By Admin | Updated: December 30, 2014 01:59 IST2014-12-30T01:59:59+5:302014-12-30T01:59:59+5:30
किडनी, फुप्फुस, यकृताच्या आजारावर औषधोपचार करीत असताना काही वेळा औषधोपचारांचा परिणाम रुग्णांवर होत नाही.

अवयवदान करणाऱ्यांची संख्या दुप्पट
मुंबई : किडनी, फुप्फुस, यकृताच्या आजारावर औषधोपचार करीत असताना काही वेळा औषधोपचारांचा परिणाम रुग्णांवर होत नाही. अशा वेळी या रुग्णांना डॉक्टर प्रत्यारोपणाचा सल्ला देतात. ‘अवयवदान हेच श्रेष्ठ दान’ या ब्रीद वाक्याचा प्रसार गेल्या काही वर्षांत केला जात आहे. याचे फलित म्हणजे २०१४मध्ये गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत दुपटीने अवयवदान झाले असून, अवयवदात्यांची संख्याही दुप्पट होऊन ४१वर पोहोचली आहे.
गेल्या काही वर्षांपूर्वीपर्यंत अवयवदानाविषयी असलेल्या गैरसमजामुळे अवयवदान करण्यास व्यक्ती पुढे येत नसत. मात्र, मृत्यूनंतर शरीर मातीत मिसळून जाण्यापेक्षा अवयवदान केल्याने कोणालातरी नवीन आयुष्य मिळू शकते, ही
भावना आता लोकांच्या मनात रुजू लागली आहे. २०१४ या वर्षात एकूण ४१ जणांनी कॅडेव्हर डोनेशन केले
आहे. तर २०१३मध्ये ही संख्या २४ इतकी होती.
यंदाच्या वर्षी अवयवदानाचा टक्का वाढताना दिसला. २०१३मध्ये ३६ किडनींचे दान झाले होते, २०१४मध्ये ही आकडेवारी ७१वर पोहोचली आहे. गेल्या दोन वर्षांत कॅडेव्हर डोनेशनमध्ये एकाही फुप्फुसाचे दान झालेले नाही. २०१२मध्ये २ फुप्फुसांचे दान करण्यात आले होते. २०१४मध्ये ३६ यकृतांचे दान झाल्याची माहिती मुंबईच्या विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीकडून देण्यात आली.
२४ डिसेंबर रोजी ६७वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. त्याच्या मुलाने त्या पुरुषाच्या दोन्ही किडनी आणि यकृत दान केले. तर २६ डिसेंबर रोजी ४०वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. त्याच्या दोन किडनी आणि यकृत दान केले आहे. या दोन अवयवदात्यांमुळे एकूण ६ जणांना जीवनदान मिळाले आहे. (प्रतिनिधी)
वर्ष किडनीयकृतफुप्फुस
२०१२४३१८२
२०१३३६१९०
२०१४७१३६०
वर्षदाता
२०१२२७
२०१३२४
२०१४४१