Join us

रेशन दुकानावर आता मिळणार मोफत साडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2023 14:53 IST

ठराविक सण-उत्सवानिमित्त साडीचे वाटप केले जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : रेशन दुकानावर अन्नधान्यांबरोबरच आता साडीही मिळणार आहे. राज्य सरकारच्या वस्त्रोद्योग विभागाने यासंदर्भातील निर्णय घेतला आहे. ठराविक सण-उत्सवानिमित्त साडीचे वाटप केले जाणार आहे. 

वर्षाला मिळणार एक मोफत साडी चैत्र पाडवा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गौरी-गणपती आणि दिवाळीनिमित्त रेशन दुकानातून ‘आनंदाचा शिधा’ दिला जातो. तसेच निश्चित केलेल्या सणाच्यावेळी दरवर्षी एक साडी लाभार्थिंना दिली जाणार आहे.

अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना मिळणार लाभराज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना मोफत साडी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अंत्योदय कार्डधारकांना त्याचा लाभ होणार आहे. 

टॅग्स :मुंबई