लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंब्रा–दिवा दरम्यान झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर प्रवासी सुरक्षेबाबत सादर करण्यात आलेल्या चौकशी अहवालातील शिफारशींची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यानुसार पाण्याचा निचरा होण्यासाठी असलेल्या डब्यांच्या पन्हाळीची जागा बदलण्यात येणार आहे. त्यामुळे लोकलच्या दरवाजाच्या पन्हाळीला धरून उभे राहणाऱ्या प्रवाशांचे वांधे होणार आहेत. सध्या २ ते ३ डब्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर बदल करण्यात आले आहेत.
९ जून रोजी मुंब्रा स्थानकाजवळ झालेल्या रेल्वे अपघातात पाच प्रवाशांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने समिती गठित करून सविस्तर चौकशी अहवाल तयार केला. अहवालात लोकलचे दरवाजे कायम उघडे असल्याने अनेक प्रवासी फुटबोर्डवरून किंवा डब्याच्या वरील पन्हाळीला लटकून प्रवास करतात, त्यामुळे अपघाताचा धोका वाढतो, असे स्पष्ट नमूद करण्यात आले होते. मुंब्रा दुर्घटनेचे हेच प्रमुख कारण असल्याचे चौकशी समितीने अधोरेखित केले होते. त्यानुसार निर्णय घेण्यात आला.
पन्हाळीचा आकार बदललाअपघात टाळण्यासाठी समितीने लघुकालीन व दीर्घकालीन उपाययोजना सुचवल्या असून, त्यांची अंमलबजावणी आता सुरू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. कुर्ला कारशेडमध्ये सध्या हे बदल सुरू असून, दरवाजाजवळील पन्हाळीचा आकार धनुष्यबाणासारखा उंचावण्यात आला आहे, जेणेकरून ती पकडून प्रवासी लटकू शकणार नाहीत.
Web Summary : Following a fatal accident, Mumbai local trains are modifying door drain pipes to prevent passengers from hanging, based on safety recommendations. Changes are being tested in some coaches with raised, bow-shaped pipes to deter clinging.
Web Summary : एक घातक दुर्घटना के बाद, मुंबई लोकल ट्रेनें सुरक्षा सिफारिशों के आधार पर यात्रियों को लटकने से रोकने के लिए दरवाज़े के ड्रेन पाइप को संशोधित कर रही हैं। कुछ कोचों में झुके हुए पाइपों के साथ बदलाव का परीक्षण किया जा रहा है।