Join us  

आता ई-ऑफिसचा वापर अनिवार्य; परवानग्या लवकर मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2020 6:08 PM

e-office is mandatory : कामकाज गतिमान होणार

मुंबई : एमएमआरडीएने कर्मचाऱ्यांसाठी ई-ऑफिसचा वापर अनिवार्य केला आहे. यामुळे कामकाज गतिमान होणार आहे. सार्वजनिक प्रकल्पांच्या प्रगतीसह इतर सरकारी एजन्सी व एमएमआरडीएच्या विभागांकडून लवकर परवानग्या मिळू शकणार आहेत. एमएमआरडीएच्या फायली, प्रस्तावांचे सर्व कामकाज ई-ऑफिसमार्फत सादर केले गेले असून, अंमलबजावणी करण्यात आली आहे.एमएमआरडीएने ३ विभांगांसाठी ई-ऑफिस सुरु केले होते. आता ई-ऑफिस सॉफ्टवेअर विकसीत केले आहे. या प्रणालीमुळे मोबाईलवरही ई-ऑफिसचा वापर करता आला. कार्यालयातील पेपरवर्क कमी झाल्यामुळे कार्बन फूटप्रींटही कमी होण्यास मदत होणार आहे.  व्हिडिओ कॉन्फरन्सिंग साधनांचा प्रभावीपणे वापर केला. डिजिटल ॲप्लिकेशन्सद्वारे ई-ऑफिस कसे वापरावे याबद्दल ६०० कर्मचाऱ्यांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले. डिजिटल स्वाक्षरी म्हणजेच ई-साइन सेवा सुरु केली. प्रणालीत सुरक्षीतता आणण्यात आली आहे.वर्क फ्रॉम होमच्या संकल्पनेतून ई-मेलवर विविध प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. तांत्रिक सहाय्य आणि ई-ऑफिस प्रयोगाच्या सॉफ्टवेअर देखभालीसाठी एनआयसीची मनुष्यबळ सेवा संस्था याचे मनुष्यबळ नियुक्त केले आहे. लॉकडाऊनच्या अगोदर ई-ऑफिसचा वापर हा फक्त लोकल एरिया नेटवर्क वापरणाऱ्या म्हणजेच कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीच होता.  ------------------------सर्व प्रकल्पांची गुणवत्ता वाढवणे आणि ते वेळेत पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रीत आहे. लॉकडाऊनच्या काळात आयटी सेलमध्ये सुधारणा झाली. डिजिटल वर्किंगच्या वापरामुळे प्रकल्पांच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होईल. प्रकल्प यशस्वीरीत्या अंमलात आणण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्याची क्षमता वाढली आहे. आमचे कार्यालय आता प्रत्यक्षात फायली घेत नाही. फक्त ई-फायली स्वीकारतो. सर्व विभागांना फाइल्स ऑनलाइन पाठविण्यास प्रवृत्त केले गेले आहे.- आर. ए. राजीव, महानगर आयुक्त, एमएमआरडीए

 

टॅग्स :एमएमआरडीएडिजिटलमुंबईसरकार