म्युङिाअमला आता ‘इटली’ टच!
By Admin | Updated: August 7, 2014 01:55 IST2014-08-07T01:55:45+5:302014-08-07T01:55:45+5:30
वस्तुसंग्रहालयातील कलाकृतींना नवीन झळाळी देण्यासाठी आणि त्यांचे आयुर्मान वाढविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाने पुढाकार घेतला आहे.

म्युङिाअमला आता ‘इटली’ टच!
>स्नेहा मोरे - मुंबई
वस्तुसंग्रहालयातील कलाकृतींना नवीन झळाळी देण्यासाठी आणि त्यांचे आयुर्मान वाढविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे आता छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयातील कलाकृतींनाही ‘इटली’ टच मिळणार
आहे. वस्तुसंग्रहालयात कलाकृतींचे जतन करण्यासाठी इटलीहून विशेष लेझर मशीन आणले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात संग्रहासाठी अनेक कलाकृती नव्याने येत असतात. मात्र त्यांचा सांभाळ करणो, त्यांना नव्या स्वरुपात साकारणो आणि त्यांचे आयरुमान वाढविणो या अत्यंत कठीण गोष्टी आहेत. याकरिता, वस्तुसंग्रहालयात पारंपरिक पद्धतींचा अवलंब केला जात असे. मात्र आता वस्तुसंग्रहालयात इटलीहून ‘निओडिमिअम लेझर मशीन’ आणले आहे. इटलीहून आणलेल्या या मशीनसाठी तब्बल 26 लाख रुपये खर्च आला आहे. याच मशीनमधील लेझरचा वापर डोळ्य़ांच्या शस्त्रक्रियेसाठीही केला जातो.
गेल्या काही दिवसांपासून लेझर मशीनच्या माध्यमातून कमी कालावधीत एखाद्या कलाकृतीचे स्वरुप पालटते. या मशीनच्या माध्यमातून हस्तिदंत, लाकूड, धातू, सिरॅमिक, माती, कपडे, कागद अशा वेगवेगळ्य़ा माध्यमातील कलाकृतींवर सहज काम करणो शक्य झाले आहे. प्रत्येक कलाकृतीचे माध्यम लक्षात घेऊन या लेझर मशीनमधील ऊर्जा, प्रकाश, वेळ यावर नियंत्रण राखावे लागते.
वस्तुसंग्रहालयातील या नव्या मशीनमुळे खूप कमी वेळात कलाकृतींचा आयाम बदलतो. त्यामुळे वेळेची बचत होऊन अधिकाधिक कलाकृतींचे संवर्धन करणो सोपे झाले आहे. या मशीनप्रमाणोच पाश्चात्त्य देशांमध्ये अनेक वेगवेगळ्य़ा पद्धतींचा वापर होतो. त्यामुळे अशा संवर्धक पद्धतींचा अवलंब भारतातील वस्तुसंग्रहालयानेही करावा, अशी आशा आहे, असे वस्तुसंग्रहालयाचे मुख्य संवर्धक सल्लागार अनुपम शहा यांनी सांगितले.
वस्तुसंग्रहालयातील लेझर मशीनचे मुख्य वैशिष्टय़ म्हणजे, कलाकृतींच्या काळाची अचूकता ठरविण्यासाठी ही मशीन प्रामुख्याने मदत करते. कलाकृतींवरील ‘पेटिना’ शोधणो, आणि वर्षानुवर्ष त्याचे जतन करणो सोपे बनले आहे. शिवाय, या लेझर मशीनच्या वापरामुळे कलाकृतीचे ऐतिहासिक मूल्य जपले जाते.