आता वीज ग्राहकांना पर्याय
By Admin | Updated: November 29, 2014 00:31 IST2014-11-29T00:31:17+5:302014-11-29T00:31:17+5:30
केंद्रीय विद्युत अपिलीय लवादाने महाराष्ट्र वीज नियामक आयोगाला स्विच ओव्हर आणि चेंज ओव्हर वीज ग्राहकांसाठी प्रोटोकॉल तयार करण्याचे निर्देश दिले आहेत.

आता वीज ग्राहकांना पर्याय
मुंबई : केंद्रीय विद्युत अपिलीय लवादाने महाराष्ट्र वीज नियामक आयोगाला स्विच ओव्हर आणि चेंज ओव्हर वीज ग्राहकांसाठी प्रोटोकॉल तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्राच्या या निर्देशानंतर आयोगाकडून यासंबंधीचे प्रोटोकॉल तयार झाल्यानंतर वीज ग्राहकांना वीज कंपनी निवडण्याचा पर्याय खुला होणार आहे.
रिलायन्स-इन्फ्रा या वीज कंपनीने महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे टाटा पॉवरविरोधात एक याचिका दाखल केली होती. या याचिकेत आर-इन्फ्राने टाटा पॉवर ही वीज कंपनी केवळ मोठे वीज ग्राहक घेते आणि छोटे वीज ग्राहक घेत नाही, असा आरोप केला होता. या याचिकेवर आयोगाने निर्णय देताना टाटा पॉवरने 3क्क् युनिटर्पयत वीज वापरणारे वीज ग्राहकही घ्यावेत, असे निर्देश दिले होते. मात्र आर-इन्फ्राच्या आरोपांवर हरकत घेत टाटा पॉवरने केंद्रीय विद्युत अपिलीय लवादाकडे धाव घेतली. शिवाय टाटा ‘चेरीपिकिंग’ करीत नाही; म्हणजे मोठय़ा ग्राहकांसह छोटे ग्राहकही कंपनी घेते, असा मुद्दा मांडला. यावर केंद्रीय विद्युत अपिलीय लवादानेदेखील टाटा ‘चेरीपिकिंग’ करीत नाही, असे म्हटले.
वीज कंपन्यांच्या डय़ुप्लिकेशन पॉवर नेटवर्कमुळे वीज ग्राहकांना कंपनी बदलताना अडथळे येतात. यावर केंद्रीय विद्युत अपिलीय लवादाने वीज कंपन्यांनी डय़ुप्लिकेशन पॉवर नेटवर्क उभारू नये, असेही निर्देश दिले. शिवाय प्रत्येक वीज कंपनीला विजेचे समांतर जाळे उभारण्याचा हक्क असल्याचे केंद्रीय विद्युत अपिलीय लवादाने नमूद केले.
दरम्यान, केंद्रीय विद्युत
अपिलीय लवादाने महाराष्ट्र वीज नियामक आयोगाला स्विच ओव्हर आणि चेंज ओव्हर वीज
ग्राहकांसाठी प्रोटोकॉल तयार करण्याचे निर्देश दिल्याने या प्रोटोकॉलनंतर आता 3क्क् युनिटपेक्षा कमी आणि 3क्क् युनिटहून अधिक वीज वापरणा:या ग्राहकांना वीज कंपनी निवडण्याचा पर्याय खुला होणार असल्याने वीज कंपन्यांमधील स्पर्धा अधिक तीव्र होणार आहे. (प्रतिनिधी)
स्विच ओव्हर कंङयुमर म्हणजे असे वीज ग्राहक जे विजेसाठी थेट एखाद्या वीज कंपनीकडे अर्ज करू शकतात आणि त्या ग्राहकांना संबंधित वीज कंपनीच्या वीज वितरण जाळ्यातून वीज पुरविली जाते.
चेंज ओव्हर कंङयुमर म्हणजे एका वीज कंपनीकडून दुस:या वीज कंपनीकडे ग्राहकांना सहज जाता येते. परंतु, जुन्याच वीज कंपनीच्या वीज वितरण जाळ्यातून संबंधित ग्राहकाला विजेचा पुरवठा केला जातो.