आता आमचीही सटकली
By Admin | Updated: September 30, 2014 00:40 IST2014-09-30T00:40:19+5:302014-09-30T00:40:19+5:30
गेल्या आठवडय़ात राजकीय पटलावर युती आणि आघाडीत बिघाडी झाली. या राजकीय घटस्फोटांनंतर मतदारांमध्ये साहजिकच संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

आता आमचीही सटकली
>गेल्या आठवडय़ात राजकीय पटलावर युती आणि आघाडीत बिघाडी झाली. या राजकीय घटस्फोटांनंतर मतदारांमध्ये साहजिकच संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. या सगळ्य़ा घडामोडी राज्यकत्र्यानी केवळ सत्तेच्या स्वार्थासाठी केल्याची भावना तरुण मतदारांमध्ये आहे. महाराष्ट्राच्या विकासाचा विचार न करता नेतेमंडळी केवळ आपल्या ‘खुर्ची’चा विचार करीत असल्याची परखड टीकाही तरुणाईने केली. विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर निर्णायक ठरणा:या तरुण मतदारांना राजकारणाच्या सद्य:स्थितीबद्दल वाटणारा रोष टिपलाय रोहित नाईक आणि सायली कडू यांनी.
प्रत्येकाचा प्रभाव दिसून येईल
सध्याच्या फुटाफुटीच्या घटनेमुळे एक चांगली गोष्ट होईल, ती म्हणजे आता आपल्याला खरा राजकीय नेता मिळेल. त्याचबरोबर निवडून येणा:या पक्षाचा मतदारांवर किती प्रभाव आहे, हेही आता कळेल. आजर्पयत खांद्याला खांदे लावून एकत्रित लढणारे सारेच पक्ष स्वतंत्रपणो लढणार असल्याने कोण किती पाण्यात आहे, हे सर्वाच्या समोर येणार आहे. त्यामुळे कधी नव्हे तेवढा या विधानसभा निवडणुकीसाठी मी खूप उत्साहित आहे.
- कौशल विश्वकर्मा, दालमिया कॉलेज, मालाड
जनहितासाठी नव्हे,
सत्तेसाठीची लढत
या घटस्फोटामुळे एक स्पष्ट झाले, की जनहितासाठी नव्हे तर सत्तेसाठीच सर्वाची लढाई आहे. यंदाच्या निवडणुकीत स्पष्टच होईल, की कोणत्या पक्षात खरी ताकद आहे. लोकांच्या मतांचा कौल कोणत्या पक्षाला मिळेल, हे पाहणो मजेशीर ठरणार आहे. आजचे राजकीय चित्र पाहून एवढेच वाटते, की ती वेळ लांब नाही; जेव्हा लोकशाही संपून हुकूमशाही भारतात असेल.
- मल्हार फडके, जे. एम. पटेल कॉलेज
पंचरंगी लढत
पाहण्यासारखी ठरेल
‘यंदाच्या विधानसभा निवडणुकीतील पंचरंगी लढत पाहण्यात मजा येणार आहे. प्रत्येकाला समजेल आपण किती पाण्यात आहोत ते. मोदींची लाट किती आहे किंवा शिवसेनेचे मराठी माणसावरील प्रेम किती आहे ते समजेल. राष्ट्रवादी आणि कॉँग्रेस विकासाचा मुखवटा घालून लोकांसमोर फिरत आहे, त्याला मतदार राजा किती भुलेल हे पाहण्यासारखे आहे. जागा वाटपावरुन हे राजकीय पक्ष वेगळे होऊ शकतात, तर सत्ता आल्यावर सामान्य माणसांचे काय होईल याचा विचार सर्वानी केला पाहिजे.
- मुकूंद पबाळे, रुईया महाविद्यालय
लोकशाही संपुष्टात येतेय
सध्याच्या राजकीय परिस्थितीचे स्वरूप अत्यंत वाईट झाले आहे. कोणत्याही पक्षाला देशाचे किंवा नागरिकांचे हित पाहायचे नसून, केवळ सत्तेसाठीच हा लढा सुरू आहे. मुख्यमंत्रिपदासाठीची ही लढाई सुरू आहे. त्यात भाऊ भाऊ असो किंवा 25 वर्षापूर्वीची युती काय नि आघाडी काय सर्वच एकसमान. देशाचे भविष्य अवघड झाले आहे.
- प्रथमेश म्हात्रे, ठाकूर इंजिनीअरिंग कॉलेज
रोजगारात शिक्षणाच्या
अटी नको
आजही नोकरीच्या शोधात तरुणाला वणवण भटकावे लागते. त्यात पदवीधर होऊनही शिक्षणाच्या वाढीव अपेक्षेमुळे रोजगारापासून मुकावे लागते. तसेच नोक:यांसाठी जास्त शिक्षण असावे, याकडे सर्वाचा कल असतो. तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींना ज्या कामांसाठी त्यांना वेतन मिळते तेच काम केल्यानंतर ठिकठिकाणी त्यांच्या नावाचे फलक लावणो बंद करावे.
- दिव्या सोलंकी, विद्यार्थी, मुलुंड
कोणाल मत द्यायचं
हाच मोठा प्रश्न
यंदा ऐन निवडणुकीच्या तोंडावर युती तुटली याचं दु:ख आहे. दोन चांगले आणि भक्कम पक्ष केवळ वादविवादामुळे दूर झालेत, याचा नक्कीच विपरीत परिणाम होईल. लोकसभा निवडणुकीच्यावेळी ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून दोन्ही पक्षांनी बाजी मारली. मात्र आता काय करायच, असा प्रश्न निदान मला तरी पडला आहे. कारण आजच्या तरुणाईचा कल निश्चित मोदींकडे जरी असला तरी मत कोणाला द्यायचं, याबबतच मोठा गोंधळ आहे. कदाचित निकालानंतर पुन्हा एकदा युती किंवा आघाडी पाहायला मिळेल. मात्र आता तरी नक्की काही सांगता येणार नाही.
- प्रेमानंद घाग (एनएमआयटीडी कॉलेज, दादर)
काळ्या पैशांची पुन्हा रेलचेल
सध्या जे राजकारण सुरू आहे, त्यात पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतात त्याप्रमाणो कार्यकत्र्याना वागावे लागते. मात्र त्या कार्यकत्र्याचा विचार करताना कोणताच राजकीय पक्ष अस्तित्वात नाही. युती-आघाडीत झालेल्या घटस्फोटांमुळे ज्यांची सत्ता महाराष्ट्रावर येईल, ती केवळ थोडय़ाफार मतांच्या फरकामुळे असेल. यातच आता प्रत्येक पक्ष पैशाची खैरात वाटून मते मिळवण्याचा प्रय} करेल. म्हणजेच काळ्या पैशाची पुन्हा रेलचेल दिसून येईल. लोकशाहीत अशी निवडणूक न येणोच जास्त चांगले.
- अन्वय निकम, मिठीबाई कॉलेज
संभ्रम वाढलाय
पूर्वी सगळे जण एकत्रित लढताना दरवेळी आश्वासन द्यायचे आणि निवडून आल्यानंतर त्या आश्वासनांकडे मात्र दुर्लक्ष होत असे. आता प्रत्येक प्रमुख पक्ष स्वतंत्र लढत असल्याने कोणत्या पक्षाची किती ताकद आहे, हे दिसेल. आता आश्वासनांकडे दुर्लक्ष शक्यतो होणार नाही. शिवाय सध्या प्रत्येक पक्ष युती किंवा आघाडी तुटल्याचे खापर एकमेकांवर फोडत आहे. तसेच सत्तेसाठी पक्षबदल देखील होत असल्याने नक्की कोणाला आणि कशासाठी मत द्यायचे, याबाबतीत संभ्रम आहे.- चेतन काते,
डहाणूकर कॉलेज, विलेपार्ले
काँटे की टक्कर
प्रत्येक पक्ष स्वबळावर लढणार असल्याने प्रत्येकालाच मतांच्या विभाजनाचा फटका बसणार आहे. त्यामुळेच संभाव्य निकाल काय असेल याचा अंदाज बांधणो या वेळी खूपच कठीण आहे. तरी प्रमुख लढत ही भाजपा-शिवसेना यांच्यातच असेल. लोकसभेसाठी एका उद्देशाने लढलेले हे पक्ष महाराष्ट्रात एकमेकांसमोर उभे राहतील. त्यामुळे या वेळी काँटे की टक्कर पाहायला मिळेल.- केतन बावकर,
गोखले कॉलेज, बोरीवली
मतदारांनी जागे व्हावे
सध्याच्या राजकीय घडामोडींकडे पाहून प्रत्येक जण पैसा मिळवण्यासाठी राजकारण करीत असल्याचे वाटते. यामुळे नागरिकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न देखील होत आहे. हे अत्यंत चुकीचे आहे. आज सत्ता मिळवण्यासाठी बहुतेक जण आपल्या पक्षाला सोडचिठ्ठी देत आहे. या सर्व प्रकाराकडे पाहून मतदारांनी वेळीच जागे व्हावे. ज्या उमेदवाराकडे खरंच समाजासाठी चांगले काम करण्याची क्षमता आहे, त्यालाच मतदारांनी निवडून द्यावे.
- अर्चना भिसे,
डॉ. आंबेडकर कॉलेज, वडाळा