मुंबई : राज्य सरकारने महात्मा फुले जनआरोग्य योजना व्यापक करत अवयव प्रत्यारोपणाचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे यकृत, किडनी, हृदय, फुफ्फुस आदी अवयवांच्या प्रत्यारोपणासाठी गरीब आणि गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. या योजनेंतर्गत रुग्णालयांना पाच लाख रुपयांचे पॅकेज देण्यात येईल. त्यात शस्त्रक्रिया, औषधे, आयसीयू सुविधा, तपासण्या आदींचा समावेश असेल. खर्च ठराविक मर्यादेपेक्षा जास्त झाल्यास, विशेष निधीमधून भरपाई दिली जाईल.
आवश्यक कागदपत्रेरुग्णाचे आधारकार्ड, रेशनकार्ड किंवा युपीआय कार्ड, एसईसीसी लाभार्थी क्रमांक, शासकीय ओळखपत्र (काही प्रकरणांत), डॉक्टरांचे सल्लापत्र किंवा उपचार नोंद.
लाभार्थी कोण? अंत्योदय/अन्न सुरक्षा रेशनकार्डधारक, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे कुटुंब, दिव्यांग, नोंदणीकृत बांधकाम कामगार, शासकीय मदतनिधीत शिकणारे विद्यार्थी.
योजनेत १,३२६ आजार समाविष्ट या योजनेत १,३२६ आजारांवर मोफत उपचार केले जातात. मात्र, नवीन विस्तार योजनेत अवयव प्रत्यारोपण, दुर्मिळ व अपवादात्मक आजार, दीर्घ कालावधीचे यासारखे २,६०० पेक्षा अधिक आजारांचा नव्याने समावेश होणार आहे.
उपचार प्रक्रिया पूर्णतः ऑनलाइन प्रत्येक रुग्णालयातील आरोग्य मित्र ऑनलाइन पद्धतीने रुग्णांची नोंदणी करतात. रुग्ण नोंदणी, पात्रता पडताळणी, मंजुरी, बिलिंग, नंतरचा फॉलोअप हे सर्व काही ऑनलाइन पोर्टलवरून नियंत्रित केले जाते.
जादा खर्चही विशेष निधीतून अत्यवस्थ रुग्णांचा खर्च ठरवलेल्या मर्यादेपेक्षा अधिक झाल्यास विशेष निधीतून भरपाई दिली जाणार आहे. यामध्ये कॅन्सर, प्रत्यारोपण, दुर्मिळ आजार, आयसीयूमधील दीर्घकालीन उपचार यांचा समावेश आहे. यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा अहवाल, संबंधित रुग्णालयाची विशेष निधीसाठी शिफारस आवश्यक आहे. ''
अशी होते प्रक्रियारुग्ण नोंदणी - रुग्णालयातील आरोग्य मित्रामार्फतपात्रता पडताळणी - आधार/रेशनकार्ड व एसईसीसी यादी तपासणीवैद्यकीय सल्ला व प्रस्ताव - डॉक्टरांकडून उपचार योजनेची नोंदऑनलाइन मंजुरी - शासन प्रणालीतून मान्यतामोफत उपचार सुरू - मंजुरीनंतर रुग्णालयात उपचार सुरूबिलिंग व क्लेम प्रक्रिया - प्रणालीतून थेट नोंद आणि भरपाई