आता कल्याण, एलटीटी स्थानकात ‘जम्बो हवा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 06:07 IST2017-08-18T06:06:59+5:302017-08-18T06:07:01+5:30

मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील छतावर जम्बो फॅन सुरू आहे.

Now the 'Jumbo Air' in Kalyan, LTT station | आता कल्याण, एलटीटी स्थानकात ‘जम्बो हवा’

आता कल्याण, एलटीटी स्थानकात ‘जम्बो हवा’

मुंबई : मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील छतावर जम्बो फॅन सुरू आहे. प्रवासी गर्दी मोठ्या प्रमाणात असलेल्या स्थानकांवरदेखील असे फॅन बसविण्याची विनंती प्रवाशांतर्फे करण्यात आली होती. प्रवाशांच्या मागणीला प्रतिसाद देत मध्य रेल्वेने कल्याण आणि लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकांवर फॅन बसविण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. या फॅनमुळे प्रवाशांची उष्णतेपासून सुटका होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस प्रमाणे कल्याण आणि एलटीटी स्थानकांतदेखील प्रवाशांचा चांगला ‘फिडबॅक’ मिळेल, असा विश्वास रेल्वे सूत्रांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Now the 'Jumbo Air' in Kalyan, LTT station