आता JIO च्या अनलिमिटेड सेवेसाठी 303 रूपये
By Admin | Updated: February 21, 2017 16:52 IST2017-02-21T16:28:42+5:302017-02-21T16:52:57+5:30
रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांनी जिओबाबत आज मोठी घोषणा केली. 31 मार्चनंतर जिओची सेवा मोफत नसेल हे त्यांनी स्पष्ट केलं मात्र,

आता JIO च्या अनलिमिटेड सेवेसाठी 303 रूपये
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 21 - रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांनी जिओबाबत आज मोठी घोषणा केली. 31 मार्चनंतर जिओची सेवा मोफत नसेल हे त्यांनी स्पष्ट केलं मात्र,यासोबतच त्यांनी ग्राहकांसाठी एका नव्या ऑफरची घोषणा केली. 1 एप्रिलपासून प्राईम ऑफरची घोषणा त्यांनी केली. या ऑफरनुसार ग्राहकांना प्रतिमहिना 303 रूपयांमध्ये 12 महिन्यांसाठी अनलिमिटेड इंटरनेट वापरता येईल.
या ऑफरचा लाभ घेण्यासाठी 1 मार्च ते 31 मार्च या काळात प्राईम मेंबरशिपसाठी नोंदणी करणं आवश्यक असणार आहे. 99 रुपयांत प्राईम मेंबरशिप घेता येईल. मेंबरशिप घेतल्यास 303 रुपये प्रतिमहिना दराने 31 मार्च 2018 पर्यंत अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि डेटा वापरता येईल. म्हणजेच आता जिओ वापरण्यासाठी प्रतिदिन 10 रुपये खर्च येणार आहे. जिओची प्राईम मेंबरशिप जिओच्या वेबसाईटवर किंवा अॅपवरुन मिळवता येईल, याशिवाय जिओ स्टोअरमध्ये जाऊनही मेंबरशिप घेता येईल.
यावेळी अंबानी यांनी रिलायन्स जिओनं गेल्या सहा महिन्यांत 100 दशलक्ष ग्राहकांचा टप्पा ओलांडला असल्याचं सांगितलं. येणा-या काही दिवसांमध्ये 99 टक्के युझर्सकडे जिओ असेल, असा दावाही अंबानी यांनी यावेळी केला.