आता पंचायत समिती सभापती निवडीकडे लक्ष

By Admin | Updated: February 12, 2015 22:57 IST2015-02-12T22:57:14+5:302015-02-12T22:57:14+5:30

पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतीपदाची निवडणुक येत्या १६ फेब्रु. रोजी घेण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी वसईचे

Now focus on selection of Chairman of Panchayat Samiti | आता पंचायत समिती सभापती निवडीकडे लक्ष

आता पंचायत समिती सभापती निवडीकडे लक्ष

वसई : पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतीपदाची निवडणुक येत्या १६ फेब्रु. रोजी घेण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी वसईचे प्रांताधिकारी दादा दातकर यांची पिठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
वसई पंचायत समितीमध्ये बहुजन विकास आघाडीला पूर्ण बहुमत मिळाले आहे. एकुण ८ जागांपैकी ६ जागांवर त्यांचे उमेदवार निवडून आल्यामुळे सभापती व उपसभापतीपद त्यांच्याकडे जाणार आहे. विरोधी पक्षाला केवळ दोन जागा मिळाल्यामुळे विरोधीपक्ष या निवडणुका लढवण्याच्या फंदात पडणार नाही असा राजकीय वर्तूळातून अंदाज व्यक्त होत आहे. सुमारे दोन वर्षाच्या कालावधीनंतर बहुजन विकास आघाडीला पुन्हा वसई पंचायत समितीवर वर्चस्व मिळवणे शक्य झाले आहे. सभापती व उपसभापतीपदी कोणाची वर्णी लावायची याबाबतचा निर्णय बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांच्या हाती आहे. सोमवारी ११ वा. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांची नावे स्पष्ट होतील असे आघाडीच्या सूत्राने सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Now focus on selection of Chairman of Panchayat Samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.