आता दर मंगळवारी पाणीपुरवठा बंद
By Admin | Updated: January 10, 2015 22:40 IST2015-01-10T22:40:10+5:302015-01-10T22:40:10+5:30
उल्हास नदीवरील पाणी वापरणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना आठवड्यातून एक दिवस (२४ तास) पाणी बंद ठेवण्याच्या सूचना राज्य शासनाच्या लघुपाटबंधारे विभागाने दिल्या आहेत.

आता दर मंगळवारी पाणीपुरवठा बंद
कल्याण : उपलब्ध पाणीसाठ्याचे पुढील पावसाळ्यापर्यंत नियोजन करण्याकरिता तसेच पाणीबचत आणि पाणीपुरवठा सुरळीतपणे राहण्याच्या अनुषंगाने उल्हास नदीवरील पाणी वापरणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना आठवड्यातून एक दिवस (२४ तास) पाणी बंद ठेवण्याच्या सूचना राज्य शासनाच्या लघुपाटबंधारे विभागाने दिल्या आहेत.
त्यानुसार, कल्याण-डोंबिवली महापालिकेतर्फे दर मंगळवारी (सोमवार रात्री १२ ते मंगळवार रात्री १२ ) २४ तास बारावे, मोहिली, टिटवाळा, नेतिवली या जलशुद्धीकरण केंद्रांतून होणारा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. परिणामी, बुधवारीदेखील कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा साठा करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)