Join us
Daily Top 2Weekly Top 5

आता पार्किंगची चिंता नको, घरबसल्या बुक करा जागा अन् वेळ! पालिकेच्या अर्थसंकल्पातही सूतोवाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 17:23 IST

महापालिकेतर्फे आता स्मार्ट वाहनतळ प्रकल्प राबवला जाणार आहे. यासाठीची निविदा प्रक्रिया राबिवली जाणार

मुंबई

महापालिकेतर्फे आता स्मार्ट वाहनतळ प्रकल्प राबवला जाणार आहे. यासाठीची निविदा प्रक्रिया राबिवली जाणार असून या उपक्रमांतर्गत मोबाइल पार्किंग अॅप्लिकेशन विकसित केले जाईल. याद्वारे नागरिकांना घरबसल्या मोबाइलवर इच्छितस्थळी जाण्यापूर्वी पार्किंगची जागा विशिष्ट वेळेसाठी आगाऊ आरक्षित करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. 

अर्थसंकल्पात याबाबत माहिती देण्यात आली आहे. हा प्रकल्प सार्वजनिक भागीदारी तत्त्वार राबविण्यात येईल. यामुळे पालिकेवर ताण येणार नाही. कंत्राटदाराकडून महसुलामधील हिस्सा प्राप्त होईल. या प्रकल्पाची अंमलबजावणी ५३० नवीन वाहनतळांवर करण्यात येईल, तर पुढील टप्प्यात इतर ऑन स्ट्रीट व ऑफ स्ट्रीट वाहनतळांचाही समावेश होईल. 

फुटपाथ सुधारणायुनिव्हर्सल फुटपाथ पॉलिसीअंतर्गत अधिक पादचारी अनुकूल व दिव्यांग पदपथ निर्माण करण्यावर महापालिका भर देत आहे. त्यानुसार शहर पूर्व व पश्चिम उपनगरात आता असलेल्या फूटपाथची सुधारणा केली जाणार आहे. 

वाहतूककोंडीवर उपाय१. रस्त्यावर ६५ ठिकाणी सशुल्क वाहनतळे आहेत. त्यांची एकूण क्षमता ८ हजार २५८ आहे. 

२. याशिवाय ३७ ठिकाणी सार्वजनिक पार्किंगच्या निविदेसाठीची कामे सुरू करण्यात आली आहेत. या वाहनतळांची एकूण क्षमता २७ हजार ७६९ इतकी आहे. 

भूमिगत वाहनतळसिद्धिविनायक मंदिराच्या सभोवताली सौंदर्यीकरणासह उर्वरित कामे तीन टप्प्यांत केली जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात इतर कामांसोबतच तळघरात दोन मजले भूमिगत वाहनतळ सुविधा उभारण्याच्या कामाचा समावेश आहे. ही सुविधा पहिल्यांदा जी उत्तर विभागात राबविली जाईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर विभागांतही राबविली जाईल.

English
हिंदी सारांश
Web Title : Book Parking Spots Online: Mumbai's Smart Parking Solution Unveiled

Web Summary : Mumbai introduces a smart parking system with a mobile app, allowing users to reserve parking spaces in advance. The initiative will begin with 530 parking locations and later expand. Footpath improvements and underground parking near Siddhivinayak temple are also planned to ease traffic congestion.
टॅग्स :मुंबईपार्किंग