'आता अग्निसुरक्षेबाबत नागरिकांनीच सजग व्हावे'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 03:08 AM2019-12-29T03:08:13+5:302019-12-29T03:08:18+5:30

- सचिन लुंगसे  आपण सर्वच अग्निसुरक्षेकडे दुर्लक्ष करतो. सहजपणे अग्निशमन कायदे, नियमांचे उल्लंघन करतो. मोठ्या आगीच्या घटनेनंतर काही काळ त्यावर ...

'Now citizens should be aware of fire safety' | 'आता अग्निसुरक्षेबाबत नागरिकांनीच सजग व्हावे'

'आता अग्निसुरक्षेबाबत नागरिकांनीच सजग व्हावे'

googlenewsNext

- सचिन लुंगसे 

आपण सर्वच अग्निसुरक्षेकडे दुर्लक्ष करतो. सहजपणे अग्निशमन कायदे, नियमांचे उल्लंघन करतो. मोठ्या आगीच्या घटनेनंतर काही काळ त्यावर चर्चा करतो व सहजपणे विसरून जातो. मागील दहा वर्षांत मुंबईत ४८ हजार ४३४ आगी लागल्या असून, यात ६०० जणांनी जीव गमावला. आधुनिकीकरणाच्या वेगाबरोबर आगीच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. शिवाय अग्निसुरक्षेबाबतही तितकेसे ज्ञानप्रबोधन झालेले नाही, अशी खंत मुंबई अग्निशमन दलाचे माजी अधिकारी सुभाष राणे यांनी व्यक्त केली. आगीच्या वाढत्या घटना पाहता आता आपण अग्निसुरक्षेबाबत सजग होणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. याचसंदर्भात त्यांच्याशी केलेली बातचीत.

प्रश्न - तृतीय पक्षी लेखा परीक्षण कितपत महत्त्वाचे आहे?
उत्तर - आॅडिटर अथवा लेखा परीक्षक हे नाव ऐकले तरी प्रत्येकाच्या मनात एकच विचार येतो, तो म्हणजे आपल्या कामकाजातील, यंत्रणेमधील चुका दाखवण्यासाठी संस्थेने नेमलेली खडूस व्यक्ती अथवा संस्था. परंतु खरेच असे असते का? खरे तर प्रत्येक संस्थेने काही कालावधीने आपल्या यंत्रणेचे, कामाच्या पद्धतीचे, विविध विभागांच्या नोंदणी पुस्तकाच्या नोंदी ठेवण्याच्या पद्धतीचे तृतीय पक्षाकडून लेखा परीक्षण करून घेतले पाहिजे. बहुतांश बहुराष्ट्रीय संस्था आपल्या कामाच्या पद्धतीत सुधारणा करून अधिक उत्पादनांबरोबरच त्याची गुणवत्ता वाढण्यासाठी तृतीय पक्षी लेखा परीक्षण ठरावीक काळाने करून घेत असतात.

प्रश्न - आगीचे धोके वाढले आहेत?
उत्तर - शैक्षणिक, व्यावसायिक, वाणिज्यिक, औद्योगिक, मालाचे गोदाम अथवा धोक्याची इमारत असो, आज भारतातील सर्वच मोठ्या शहरांमध्ये उंचच उंच निवासी इमारती, व्यावसायिक इमारती, शॉपिंग मॉल्स, मल्टिप्लेक्स, कारखाने, हॉस्पिटलच्या इमारती, उंच शालेय इमारती, तारांकित हॉटेलच्या इमारती, भूमिगत रेल्वे-मेट्रो इत्यांदीची संख्या दिवसेंदिवस अत्यंत वेगाने वाढत आहे. या सर्व इमारतींमध्ये चांगल्या सुखसुविधा पुरविताना त्यामध्ये वापरलेल्या विविध ज्वलनशील साहित्यामुळे, इमारतींमधील मोठ्या प्रमाणात होत असलेल्या वहिवाटीमुळे आगीचे धोके वाढले आहेत.

प्रश्न - इमारत वापराचा परवाना अग्निशमन दल कशा प्रकारे देते?
उत्तर - इमारत बांधताना राष्ट्रीय इमारत संहितेतील मार्गदर्शनानुसार वास्तुविशारद व बांधकाम विकासक आगप्रतिबंधक व अग्निसंरक्षण यंत्रणा इमारतीत बसवतात. त्याच्या परीक्षणानंतरच इमारत वापराचा परवाना अग्निशमन दल देते. परंतु अनेकदा यंत्रणेचे अज्ञान व देखभालीच्या खर्चाचा ताळमेळ जुळत नसल्याने या यंत्रणेकडे पुढील काळात दुर्लक्ष होते. त्यानंतर अचानक उद्भवलेल्या आगीच्या घटनेवेळी ही यंत्रणा मृतावस्थेत सापडते व आपल्या नुकसानाला आपणच जबाबदार ठरतो, हे उशिराने लक्षात येते.

प्रश्न - वाढत्या कामाचा बोजा व अधिकारी वर्गाच्या कमतरतेबाबत काय सांगाल?
उत्तर - अग्निशमन दलाच्या वाढत्या कामाचा बोजा व अधिकारी, कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात कमतरता जाणवत आहे. याचा विचार करून, तसेच आगीच्या घटना व त्यातील मृत्यूंची संख्या पाहता तृतीय पक्षाकडून अग्निपरीक्षण करणे, ही राष्ट्रीय इमारत संहितेमधील सूचनेची कठोरपणे अंमलबजावणी करण्याची गरज आहे. तसेच अग्निपरीक्षणातील त्रुटींची पूर्तता करणे संबंधित इमारती, संस्थांना बंधनकारक करायला हवे.

Web Title: 'Now citizens should be aware of fire safety'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.