Join us  

विनाआरक्षित डब्यात आता ‘बायोमेट्रिक’ प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2019 3:53 AM

तंत्रज्ञानाद्वारे रांग न लावता सीट : मध्य, पश्चिम रेल्वे स्थानकांवर सोय

मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावरील मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस आणि मध्य रेल्वे मार्गावरील सीएसएमटी आणि लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकांवर बायोमेट्रिक मशीन लावून विनाआरक्षित डब्यामधून प्रवास करणाऱ्यांना सीट बुक करता येणार आहे.

विनाआरक्षित डब्यामधून प्रवास करताना प्रवाशांना बायोमेट्रिक मशीनमधून जावे लागेल. या मशीनवर प्रवाशांच्या बोटाचे ठसे दिल्यानंतर प्रवाशाला एक क्रमांक दिला जातो. मेल, एक्स्प्रेस फलाटावर लागल्यानंतर सीट बुक होणार आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील मुंबई सेंट्रल आणि वांद्रे टर्मिनस या स्थानकावर प्रत्येकी दोन बायोमेट्रिक मशीन लावल्या आहेत. वांद्रे टर्मिनस येथील स्वराज एक्स्प्रेस, पश्चिम एक्स्प्रेस, अरावली एक्स्प्रेस, अवध एक्स्प्रेस आणि मुंबई सेंट्रल स्थानकावरील गोल्डन टेम्पल एक्स्प्रेस, जयपूर सुपर फास्ट एक्स्प्रेस, कर्णावती एक्स्प्रेस, अवंतिका एक्स्प्रेस, स्वराष्ट्र मेल आणि गुजरात मेल यामध्ये बायोमेट्रिक मशीन बसविण्यात आली आहे, अशी माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. मध्य रेल्वे मार्गावरील सीएसएमटी स्थानकावरून लखनऊला जाणाºया पुष्पक एक्स्प्रेसमध्ये बायोमेट्रिक मशीन लावून प्रयोगिक तत्त्वावर हा प्रयोग करण्यात आला. तो यशस्वी ठरल्याने आता मध्य रेल्वे मार्गावरील लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकावरून या मशीनचा प्रयोग केला जाणार आहे.अशी करता येणार जागा आरक्षितच्विनाआरक्षित डब्यामधून प्रवास करताना प्रवाशांना बायोमेट्रिक मशीनमधून जावे लागेल. या मशीनवर प्रवाशांच्या बोटाचे ठसे दिल्यानंतर प्रवाशाला एक क्रमांक दिला जातो. मेल, एक्स्प्रेस फलाटावर लागल्यानंतर सीट बुक होणार आहे.च्बायोमेट्रिक तंत्रज्ञानाने सीट बुक केल्यानंतर फलाटावर जास्त वेळ उभे राहण्याची गरज नाही. जेव्हा मेल, एक्स्प्रेसची वेळ होईल, तेव्हा फलाटावर पोहोचणे आवश्यक आहे. त्यानंतर बोटाचा ठसा देऊन प्रवास करता येईल.च्यामुळे सीटसाठी होणारी भांडणे कमी होतील. यासह डब्याची क्षमता जितकी असेल, तितकेच बोटाचे ठसे प्रिंट घेतले जातील. उशिरा येणाºया प्रवाशांनादेखील प्रवास करता येईल. मात्र त्यांना बसण्यासाठी जागा मिळणार नाही, अशी माहिती रेल्वेच्या अधिकाºयांनी दिली.

टॅग्स :मुंबईरेल्वे