आता इमान जेवते स्वतःच्या हाताने

By Admin | Updated: May 29, 2017 11:49 IST2017-05-29T11:09:23+5:302017-05-29T11:49:00+5:30

जगातील सगळ्यात वजनदार महिला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इमान अहमदवर सध्या अबुधाबीमध्ये उपचार सुरू आहेत. उपचाराला योग्य प्रतिसाद इमानकडून दिला जातो आहे.

Now the believer jumps with his own hands | आता इमान जेवते स्वतःच्या हाताने

आता इमान जेवते स्वतःच्या हाताने

लोकमत ऑनलाइन
मुंबई, दि. 29- जगातील सगळ्यात वजनदार महिला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इमान अहमदवर सध्या अबू धाबीमध्ये उपचार सुरू आहेत. उपचाराला योग्य प्रतिसाद इमानकडून दिला जातो आहे.  इमानमध्ये होत असलेल्या सुधारणेची चिन्हसुद्धा दिसायला लागली आहेत. इमान आता तोंडाने खाऊ शकते महत्वाचे म्हणजे ती स्वतःच्या हाताने जेवायचा सराव करते आहे. गेली तीन महिने तीला अन्न नलिकेने जेवण दिलं जातं होतं. मुंबईमधून तीन आठवड्यांपूर्वी इमानला उपचारासाठी अबू धाबीला हलविण्यात आलं होतं. तीन आठवड्यातच तीने उपाचाराला प्रतिसाद द्यायला सुरूवात केली आहे.
"सुरूवातीला इमानला दोन-तीन चमचे अन्न दिलं जातं होतं. पण आता ती दिवसाला पंधरा चमचे अन्न  खायला लागली आहे.  आनंदाची गोष्ट म्हणजे गेली दोन दिवस ती आर्ध्यापेक्षा जास्त जेवण स्वतःच्या हाताने खाते आहे", अशी माहिती बुर्जील हॉस्पिटलचे मुख्य वैद्यकिय अधिकारी अल्ल शाहत यांनी दिली आहे. छत्तीस वर्षीय इमान अहमद तीन महिन्याआधी जगातील सगळ्यात वजनदार महिला म्हणून ओळखली जायची. सुरुवातील मुंबईमध्ये तीला उपचारासाठी पाठविण्यात आलं होतं. त्यानंतर पुढील उपचारासाठी अबू धाबी इथे पाठविण्या आलं आहे. 
मुंबईतील सैफी हॉस्पिटलमध्ये इमानवर  बॅरिऍट्रिक सर्जरी करण्याआधी तीला लिक्विड डाएटवर ठेवण्यात आलं होतं. तोंडाने खायला दिल्यास मज्जासंस्थेच्या कार्यावर परिणाम होऊ नये, यासाठी तीला अशा पद्धतीचं डाएट देण्यात आलं होतं. 
व्हीपीएस हेल्थकेअरसह इमानच्या उपचारासाठी वीस डॉक्टरांची टीम तयार करण्यात आली आहे. यामध्ये ऑर्थोपेडीक सर्जन, ह्रदयरोगतज्ज्ञ, नेफ्रोलॉजिस्ट, गॅस्ट्रोएन्त्रोलॉजिस्ट, प्लास्टिक सर्जन, फिजीओथिएरिपिस्ट तसंच आहास तज्ज्ञांचा समावेश आहे. इमानवर सध्या सुरू असलेल्या उपाचारासाठी तीन स्टेजचं मॉडेल या डॉक्टरांच्या टीमने तयार केलं आहे. 
डॉक्टरांकडून तयार करण्यात आलेल्या तीन स्टेज मॉडेलवर विशेष भर दिला जाणार आहे. सुरूवातीला युटीआय, बेडसोअर्स, स्पिच थिएरपी, आणि पुर्नवसन या गोष्टींवर विशेष भर दिला जाइल, दुसऱ्या स्टेजमध्ये पहिले उपचार सुरू ठेवण्यावर भर असेल महत्त्वाचं म्हणजे इमानचं पुर्नवसन करण्यावर जास्त भर दिला जाणार आहे. 
जगातील सर्वात वजनदार म्हणून ओळखली जाणारी इमान अहमद ही इजिप्तची महिला वजन कमी करण्याच्या शस्त्रक्रियेसाठी मुंबईत आली होती. सुरूवातीला इमानचं वजन ५०० किलो इतकं होतं. वजनामुळे गेल्या २५ वर्षांपासून ती बिछान्यावरून उठूही शकली नाही. मुंबईत आल्यावर सैफी हॉस्पिटलचे बॅरिऍट्रिक सर्जन मुफझ्झल लकडावाला यांनी तीच्यावर उपचार केले आहेत.  
मुंबईंमध्ये इमानवर शस्त्रक्रियेसाठी वजन कमी करणे गरजे होते. त्यानुसार हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यापासून इमानचं शस्त्रक्रियेविना 120 किलो वजन घटवलं होतं. 
 

 

Web Title: Now the believer jumps with his own hands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.