Join us

लाडक्या बहिणींसाठी आता ‘आदिवासी’ विकास विभागाचे ३३५ कोटी ७० लाख; आदेश काढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 05:41 IST

आदिवासी विकास खात्याला देण्यात आलेल्या सहाय्यक अनुदानातून मे महिन्यासाठी ३३५ कोटी ७० लाख रुपयांचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळविण्यात आला आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : लाडकी बहीण योजनेसाठी आदिवासी विकास विभागाने ३३५ कोटी ७० लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आदिवासी विकास विभागाने शुक्रवारी याबाबतचा आदेश काढला.

अर्थात आदिवासी महिला ज्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत त्यांनाच या निधीतून लाडकी बहीण योजनेचे मानधन देण्यात येणार आहे. अनुसूचित जमातीच्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे अनुदान हे आदिवासी विकास विभागासाठीच्या तरतुदीतून देण्याचा निर्णय आधीच घेण्यात आला आहे. राज्य सरकारने सन २०२५-२६ या वर्षीच्या अर्थसंकल्पात अनुसूचित जमाती उपयोजनेसाठी २१ हजार ४९५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यापैकी आदिवासी विकास खात्याला देण्यात आलेल्या ३ हजार ४२० कोटी रुपयांच्या सहाय्यक अनुदानातून मे महिन्यासाठी ३३५ कोटी ७० लाख रुपयांचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळविण्यात आला आहे. 

टॅग्स :लाडकी बहीण योजनाराज्य सरकार