ठाणे, कोकणातील हॉटेलांना नोटिसा

By Admin | Updated: December 17, 2014 23:16 IST2014-12-17T23:16:04+5:302014-12-17T23:16:04+5:30

अन्न व औषध प्रशासनाने अर्थात एफडीएने कोकणातील छोट्या-मोठ्या १ हजार ८५५ हॉटेल्सची तपासणी करून ५६९ मालकांना आपल्या हॉटेलमध्ये सुधारणा करण्याबाबत नोटिसा बजावल्या

Notice to Thane, Konkan Hotels | ठाणे, कोकणातील हॉटेलांना नोटिसा

ठाणे, कोकणातील हॉटेलांना नोटिसा

ठाणे : अन्न व औषध प्रशासनाने अर्थात एफडीएने कोकणातील छोट्या-मोठ्या १ हजार ८५५ हॉटेल्सची तपासणी करून ५६९ मालकांना आपल्या हॉटेलमध्ये सुधारणा करण्याबाबत नोटिसा बजावल्या आहेत. तसेच ३३४ हॉटेलधारकांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
कोकण विभागीय अन्न व औषध प्रशासनाच्या आखत्यारीत येणाऱ्या ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांत एकूण १३ झोन आहेत. त्या झोनअंतर्गत येणाऱ्या छोट्या-मोठ्या हॉटेलची अन्न विभागाच्या शेड्यूल ४ प्रमाणे तपासणी केली जाते. त्यानुसार, एप्रिल ते नोव्हेंबर २०१४ दरम्यान अन्न व औषध प्रशासन विभागाने १३ झोनमध्ये एकूण १ हजार ८५५ ठिकाणी तपासणी केल्यानंतर ५६९ जणांना सुधारणा नोटिसा बजावल्या आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Notice to Thane, Konkan Hotels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.