Join us
Daily Top 2Weekly Top 5

मालाड दुर्घटनेप्रकरणी ठेकेदाराला नोटीस, चौकशी समितीचा अहवाल १५ दिवसांत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2019 05:00 IST

सोमवारी रात्री मालाड पूर्व, पिंपरी पाडा येथे पालिकेच्या जलाशयाची संरक्षण भिंत झोपड्यांवर कोसळून २६ लोकांचा मृत्यू झाला.

मुंबई : मालाड येथे संरक्षण भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी ठेकेदाराला महापालिकेने गुरुवारी नोटीस पाठविली. त्याचबरोबर बांधकामाचा दर्जा, आराखडा आणि भिंत कोसळण्यामागचे कारण शोधण्यासाठी चौकशी समिती स्थापन करण्यात येणार आहे. त्यानंतरचं ही भिंत कोसळण्यास ठेकेदार जबाबदार आहे की मुसळधार पाऊस हे स्पष्ट होणार आहे.सोमवारी रात्री मालाड पूर्व, पिंपरी पाडा येथे पालिकेच्या जलाशयाची संरक्षण भिंत झोपड्यांवर कोसळून २६ लोकांचा मृत्यू झाला. २०१७ मध्ये बांधलेली भिंत कोसळल्यामुळे बांधकामाच्या दर्जाबाबत शंका व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी पालिकेने ठेकेदाराला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मात्र या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाल्यानंतरच कोणी दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.संरक्षण भिंतीचे काम २०१५ मध्ये सुरू होऊन ते २०१७ मध्ये पूर्ण झाल्यामुळे या भिंतीचा हमी कालावधी २०२० पर्यंत आहे. त्यामुळे दुर्घटनेप्रकरणी कारवाई का करू नये, असे महापालिकेने ठेकेदाराला नोटीसद्वारे विचारले आहे. या नोटीस सात दिवस उत्तर देण्याची मुदत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहे. या दुर्घटनेच्या चौकशीसाठी स्थापन समितीचा अहवाल १५ दिवसांमध्ये सादर होणार आहे.दर्जा तपासणार- मुसळधार पावसामुळे पाण्याचा दाब वाढल्याने भिंत कोसळल्याचे प्राथमिक चौकशीत दिसून येत आहे. त्यातच भुशभुशीत माती आणि असमतोल उतार यामुळे त्यात भर पडल्याचे पालिकेतील एका अधिकाऱ्याने सांगितले.- या भिंतीच्या बांधकामासाठी वापरलेला माल दुय्यम दजार्चा होता. दीड वर्षांपूवीर्चं ही भिंत बांधण्यात आली होती. त्यामुळे या कामाचा दर्जा कळून येतो, अशी तक्रार स्थानिक रहिवाशी करीत आहेत.- आयआयटी मुंबई आणि व्हीजेटीआयमधील तज्जांमार्फत भिंतीच्या बांधकामाचा दर्जा आणि तांत्रिक बाबी तपासण्यात येणार आहेत.

 

टॅग्स :मालाड दुर्घटना