वीजबिल भरण्यात नोटा चालणार
By Admin | Updated: November 11, 2016 02:45 IST2016-11-11T02:45:27+5:302016-11-11T02:45:27+5:30
४ हजारपर्यंतचे वीजबिल भरण्यासाठी जुन्या पाचशे आणि हजाराच्या नोटा स्वीकारणार असल्याचे विद्युत वितारणाने जाहीर केल्याने ग्राहकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.

वीजबिल भरण्यात नोटा चालणार
पालघर : केंद्र शासनाने पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बंद केल्या मुळे आज ( गुरूवारी) शहर व जिल्ह्यातील सर्वच वीजिबल भरणा केंद्रावरून ग्राहकांना माघारी फिरावे लागले असल्याने ग्राहका मधून संतप्त भावना व्यक्त होत असतांना ४ हजारपर्यंतचे वीजबिल भरण्यासाठी जुन्या पाचशे आणि हजाराच्या नोटा स्वीकारणार असल्याचे विद्युत वितारणाने जाहीर केल्याने ग्राहकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
आधीच्या नोटबंदी आदेशामुळे आज सकाळ पासून आपली बिले भरण्या साठी गेलेल्या ग्राहकांना रिकाम्या हाताने परत फिरावे लागले होते. अशा वेळी आम्हाला वेळीच बिले भरता येणार नसल्याने आमच्यावर दंडाचा अतिरिक्त भुर्दंड पडणार असल्याचे रमेश दवणे यांनी सांगितले.याबाबत नागरिकांनी महावितरणला सहकार्य करावे, अशी विनंती वीजग्राहकांना करण्यात येत होती. या संदर्भात पालघर विद्युत वितरण विभागाचे कार्यकारी अभियंता राजाराम डोंगरे यांच्याशी संपर्क साधला असता वरिष्ठ पातळीवरून आलेल्या आदेशाची अंमलबजावणी आम्ही करीत आहोत.परंतु ग्राहकांच्या सोयी साठी ४ हजार रुपये च्या आतील रक्कमेची बिले भरण्यासाठी ५०० आणि १००० रु पयांची जुनी नोट स्वीकारली जाणार असून ४ हजार वरील रक्कमेच्या बिला साठी चेक स्वीकारले जातील असे सांगितले.
आज सर्व बँका आपल्या नेहमीच्या वेळेच्या एक तास अगोदर उघडण्याचे आदेश देण्यात आले असताना सातपाटी येथील बँक आॅफ इंडिया हि अर्धा तास उशिरो उघडली व तासा नंतर व्यवहार सुरु झाले.
(वार्ताहर)