Join us  

लाल फीत नव्हे, आता लाल गालिचा; नगरविकास मंत्री शिंदे यांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2020 3:50 AM

एकात्मिक विकास नियंत्रण नियमावली सर्वसामान्य व्यक्तीचे हित डोळ्यासमोर ठेवून बनवण्यात आली आहे.

मुंबई : विकासाचे व्यवहार्य, कल्पक प्रस्ताव सादर केले तर आता लाल फितीत अडकणार नाहीत, उलट त्यांच्यासाठी लाल गालिचा अंथरला जाईल, अशी ग्वाही राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी येथे दिली.

राज्यातील सर्व महापालिका आयुक्तांच्या परिषदेचे आयोजन मंगळवारी मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे करण्यात आले होते. गेले ८ महिने राज्यात कोरोनाचे उभे राहिलेले आव्हान आणि अलीकडेच राज्य सरकारने एकात्मिक विकास नियंत्रण नियमावलीला दिलेली मंजुरी, या पार्श्वभूमीवर प्रथमच अशा परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

शिंदे म्हणाले की, एकात्मिक विकास नियंत्रण नियमावली सर्वसामान्य व्यक्तीचे हित डोळ्यासमोर ठेवून बनवण्यात आली आहे. यामुळे हाऊसिंग स्टॉक वाढून घराच्या किमती आवाक्यात येतील. १५० चौ. मी. पर्यंतच्या भूखंडावर स्ववापरासाठी घर बांधणा-याव्यक्तीला बांधकाम परवान्याची आवश्यकता रद्द करण्याची महत्त्वाची तरतूद यात केली आहे. त्याचबरोबर पर्यटन आणि कृषी पर्यटनाला चालना देणाºया तरतुदीही यात केल्या आहेत, असे शिंदे म्हणाले. क्लस्टर डेव्हलपमेंट, तसेच एसआरए योजना राज्यभरात लागू करण्यात आल्यामुळे धोकादायक, तसेच बेकायदा इमारती व झोपडपट्टयांमध्ये जीव मुठीत धरून राहणाºया लाखो लोकांना दिलासा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. प्रत्येक शहराचे स्वत:चे वैशिष्ट्य असून त्यानुसार शहराचे ब्रँडिंग करण्याचा मानस आहे, त्यासाठी लवकरच राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनीही मनोगत व्यक्त केले. महापालिका स्तरावर थिंक टँकची स्थापना करा, अस ते म्हणाले.

टॅग्स :एकनाथ शिंदे