फक्त शोधच नाही तर ती नाळ आणखीन घट्ट केली...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:06 IST2021-03-05T04:06:27+5:302021-03-05T04:06:27+5:30
भांडूप परिसरात पती, मुलासोबत राहणाऱ्या महिला पोलीस हवालदार वैष्णवी कोळंबकर या पार्क साइट पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. १९९५ मध्ये ...

फक्त शोधच नाही तर ती नाळ आणखीन घट्ट केली...
भांडूप परिसरात पती, मुलासोबत राहणाऱ्या महिला पोलीस हवालदार वैष्णवी कोळंबकर या पार्क साइट पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. १९९५ मध्ये मुंबई पोलीस दलात रुजू झालेल्या कोळंबकर या २०११ पासून मिसिंग पथकात काम करत आहेत. त्यांच्या या १० वर्षाच्या सेवेत ५००हून अधिक मिसिंगची प्रकरणे त्यांनी हाताळली. यात, आतापर्यंत १००हून अधिक अल्पवयीन मुलांचा शोध घेत त्यांनी घेतला. कोळंबकर सांगतात, पोलीस दलात काम करताना निवृत्त पोलीस अधिकारी श्रीरंग नाडगौडा हे पहिले गुरु ठरले. तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक जुबेदा शेख, पोलीस निरीक्षक (गुन्हे) आत्माजी सावंत यांच्या तपास कसा करावा... याबाबतच्या मार्गदर्शनामुळे काम अधिक सोपे होत गेले. पतीही पोलीस दलात असल्यामुळे त्यांचे सहकार्यही तितकेच महत्त्वाचे ठरत असल्याचे त्या आवर्जून सांगतात. यात अपहरणाबरोबरच कधी आईबाबा ओरडले म्हणून घर सोडलेले तर कधी प्रेम प्रकरणामुळे पळून गेलेल्या अल्पवयीन मुलामुलींच्या शोधापर्यंतच मर्यादित न राहता त्यांना योग्य समुपदेशन करून कुटुंबाचे महत्त्व पटवून देतात. त्यामुळे त्यांच्यातील नाते आणखीन घट्ट होत आहे.