Join us

हितेंद्र ठाकूर यांचा साधा निषेधदेखील नाही; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2023 07:14 IST

एका कार्यक्रमात हितेंद्र ठाकूर यांनी, ‘पालिका कार्यालयात येऊन तुम्हाला फटकावीन’ या शब्दांत धमकी दिल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : वसई-विरार महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार आणि अन्य अधिकाऱ्यांना आ. हितेंद्र ठाकूर यांनी दिलेल्या कथित धमकीबद्दल राजपत्रित अधिकारी महासंघाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिले असून त्यात ठाकूर यांचा साधा निषेधदेखील न केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

एका कार्यक्रमात ठाकूर यांनी, ‘पालिका कार्यालयात येऊन तुम्हाला फटकावीन’ या शब्दांत धमकी दिल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. राज्यातील वर्ग अ आणि ब च्या अधिकाऱ्यांची संघटना असलेल्या राजपत्रित महासंघाने बुधवारी फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात, ठाकूर यांचे थेट नावही घेतलेले नाही.

राज्य सरकारी कर्मचारी, अधिकाऱ्यांना हल्ले व धमक्यांपासून संरक्षण देणारे भादंविच्या कलम ३५३ मध्ये सुधारणा करणार असल्याची भूमिका फडणवीस यांनी अलीकडे संपलेल्या विधिमंडळ अधिवेशनात घेतली होती. यासाठी एक बैठक तातडीने घेण्याची मागणी महासंघाचे नेते ग. दि. कुलथे यांनी केली आहे.

 

टॅग्स :हितेंद्र ठाकूरदेवेंद्र फडणवीस