सर्वच पक्षांना पडली ‘नोटा’ची धास्ती!

By Admin | Updated: October 8, 2014 23:12 IST2014-10-08T23:12:07+5:302014-10-08T23:12:07+5:30

विधानसभा निवडणुकीत युती आणि आघाडी फुटल्याने राजकीय क्षेत्रात नवी समीकरणे उदयास येत आहेत. यंदा पंचरंगी लढतीत मतविभाजनही मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे.

Not all parties fell 'Nota'! | सर्वच पक्षांना पडली ‘नोटा’ची धास्ती!

सर्वच पक्षांना पडली ‘नोटा’ची धास्ती!

स्नेहा मोरे, मुंबई
विधानसभा निवडणुकीत युती आणि आघाडी फुटल्याने राजकीय क्षेत्रात नवी समीकरणे उदयास येत आहेत. यंदा पंचरंगी लढतीत मतविभाजनही मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतदार राजाला आकर्षित करण्याचे आव्हान प्रत्येक पक्षासमोर आहे, तर दुसरीकडे राजकीय फुटीमुळे, सरकारविरोधी रोषामुळे आणि नव्या समीकरणांमुळे यंदा मत नेमके कुणाला द्यायचे, असा पेच मतदारांसमोर आहे. या संभ्रमामुळे मतदार मोठ्या प्रमाणावर ‘नोटा’ या पयार्याचा वापर करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महायुतीचा २५ वर्षांचा आणि आघाडीचा १५ वर्षांचा संसार तुटल्यामुळे राजकारणातील सर्व गणिते बदलली आहेत. शिवाय अनेकांनी बंडखोरी केल्यामुळे तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड गोंधळाचे वातावरण आहे. अशात ‘मनसे’ मात्र एकटीच निवडणूक लढत आहे. त्यामुळे एकाच मतदारसंघात सर्वच पक्ष एकमेकांच्या समोर उभे ठाकले आहेत. या सर्व घडामोडींमुळे मतदारांमध्ये कमालीची संभ्रमावस्थता आढळून येते आहे. या संभ्रमामुळे मतदार ‘नोटा’चा पर्याय स्वीकारण्याची दाट शक्यता आहे. मतदाराला कोणत्याही उमेदवाराला मत द्यायचे नसेल तर मतदार ‘नोटा’चा पर्याय स्वीकारू शकतो.
लोकसभा निवडणुकीतही सुमारे ६० लाख मतदारांनी ‘नोटा’चा पर्याय स्वीकारला होता, तर महाराष्ट्रातही एकूण मतदारांपैकी ४ लाख ३३ हजार १८० मतदारांनी नकाराधिकार वापरला होता. तर मुंबईतही अनेक मतदारसंघांतील मतदारांनीही ‘नोटा’चा पयार्य वापरला होता.

Web Title: Not all parties fell 'Nota'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.