उत्तर मुंबईकरांना गर्मीत मोफत ताकाचा दिलासा, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचा उपक्रम
By मनोहर कुंभेजकर | Updated: May 4, 2025 20:17 IST2025-05-04T20:17:17+5:302025-05-04T20:17:45+5:30
Mumbai News: सध्या मुंबईत पारा वाढलेला आहे.त्यामुळे नागरिक हैराण झाले आहे.त्यामुळे उत्तर मुंबईतील नागरिकांना उष्णते च्या लाटेत लढण्यासाठी गर्मीत मोफत ताकाचा दिलासा केंद्रीय वाणिज्य मंत्री आणि येथील स्थानिक खासदार पियुष गोयल यांनी स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने दिला आहे.

उत्तर मुंबईकरांना गर्मीत मोफत ताकाचा दिलासा, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचा उपक्रम
- मनोहर कुंभेजकर
मुंबई - सध्या मुंबईत पारा वाढलेला आहे.त्यामुळे नागरिक हैराण झाले आहे.त्यामुळे उत्तर मुंबईतील नागरिकांना उष्णते च्या लाटेत लढण्यासाठी गर्मीत मोफत ताकाचा दिलासा केंद्रीय वाणिज्य मंत्री आणि येथील स्थानिक खासदार पियुष गोयल यांनी स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने दिला आहे. येथील सहा विधानसभा मतदार संघात त्यांनी ठिकठिकाणी मोफत ताक वाटप केंद्र सुरू केले असून त्याला उत्तर मुंबईकरांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
आमच्या प्रतिनिधीने बोरिवली पश्चिम स्टेशन समोरील या मोफत ताक वाटप केंद्राला भेट दिली असता,अमूलचे थंडगार मसाले ताक भाजप व स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते नागरिकांना देत होते.तर विशेष म्हणजे मुंबईकरांच्या सुरक्षेची काळजी घेणारे पोलिस सुद्धा या असह्य गर्मीत येथील ताकाचा आस्वाद घेत होते.ताक पिल्यावर नागरिकांना गर्मीत हायसे वाटले.
उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी ताक पिणे खूप सामान्य आहे.उन्हाळ्याच्या दिवसात आजारांचा धोकाही वाढतो. ताक प्यायल्याने आरोग्य सुधारते आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत होते.उन्हाळ्यात त्याचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर असते.उन्हाळ्यात डिहायड्रेशनची समस्या दिसून येते. या समस्येवर मात करण्यासाठी उत्तर मुंबईच्या नागरिकांसाठी उत्तर मुंबईत ठिकठिकाणी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी मोफत ताक वाटप केंद्र सुरू केली असून त्याला येथील नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे जिल्हाध्यक्ष गणेश खणकर यांनी सांगितले.