उत्तर भारत कमालीचा गारठला
By Admin | Updated: December 9, 2014 02:57 IST2014-12-09T02:57:33+5:302014-12-09T02:57:33+5:30
पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणा:या थंड वा:याचा वेग वाढल्याने उत्तर भारत कमालीचा गारठला असून, येथील जवळजवळ सर्वच शहरांचे किमान तापमान 1क् अंशाच्या खाली उतरले आहे.

उत्तर भारत कमालीचा गारठला
मुंबई : पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणा:या थंड वा:याचा वेग वाढल्याने उत्तर भारत कमालीचा गारठला असून, येथील जवळजवळ सर्वच शहरांचे किमान तापमान 1क् अंशाच्या खाली उतरले आहे. महत्त्वाचे म्हणजे सोमवारी श्रीनगरचे किमान तापमान तर उणो 1.6 एवढे नोंदविण्यात आले असून, महाराष्ट्रातील प्रमुख शहरांचे किमान तापमान 11 अंशार्पयत खाली उतरल्याने राज्याला भरलेली हुडहुडी कायम आहे.
अमेरिकेतील हिमवादळानंतर पश्चिमेकडील थंड वारे पूर्वेकडे म्हणजे भारताहून चीनच्या दिशेकडे वाहू लागतात. सद्य:स्थितीमध्ये हे प्रमाण कमी असले तरी उत्तरेकडे त्याचा प्रभाव जाणवू लागला आहे. आणि याच परिस्थितीमध्ये उत्तरेकडून दक्षिणोकडे वाहणारे थंड वारे जोर पकडू लागल्याने महाराष्ट्रातील प्रमुख शहरांचे किमान तापमान खाली घसरले आहे. शिवाय मुंबईत दिवसा चटके देणारे ऊन आणि रात्री थंडी असे वातावरण निर्माण झाले असून, 7 डिसेंबर रोजी मुंबईचे किमान तापमान 16 अंश एवढे खाली घसरले होते. सोमवारी यात केवळ एका अंशाची वाढ झाली असून, 8 डिसेंबर रोजी म्हणजे सोमवारी मुंबईचे किमान तापमान 17.3 एवढे नोंदविण्यात आले आहे.
दरम्यान, भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोकण, गोवा आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीपेक्षा किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविले आहे. (प्रतिनिधी)
देशातील प्रमुख शहरांचे किमान तापमान : श्रीनगर -1.6, जम्मू 7.6, दाजिर्लिंग 5, उत्तर काशी 5.1, नैनीताल 8, लखनऊ 6.4, अलाहाबाद 9.4, आग्रा 7.7, माउंट अबू 7.4, चंदिगढ 8.5, भटिंडा 7, अमृतसर 5.4, शिलाँग 9.6, चेरापुंजी 9.5, इम्फाळ 8.5, उज्जैन 9, जबलपूर 9, इंदौर 11.5, ग्वाल्हेर 9.7, भोपाळ 11
राज्यातील प्रमुख शहरांचे किमान तापमान : अहमदनगर 8.5, गोंदिया 9.4, नागपूर 9.8, नांदेड 1क्, नाशिक 1क्.2, जळगाव 1क्.8, यवतमाळ 11.2