एफवायची प्रवेशपूर्व नोंदणी प्रक्रिया २ जूनपासून

By Admin | Updated: May 31, 2014 03:07 IST2014-05-31T03:07:39+5:302014-05-31T03:07:39+5:30

बारावीच्या निकालाची तारीख जाहीर झाल्यानंतर मुंबई विद्यापीठाने प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांचे वेळापत्रक शुक्रवारी जाहीर केले.

Non-prerequisite for FY2 from June 2 | एफवायची प्रवेशपूर्व नोंदणी प्रक्रिया २ जूनपासून

एफवायची प्रवेशपूर्व नोंदणी प्रक्रिया २ जूनपासून

मुंबई : बारावीच्या निकालाची तारीख जाहीर झाल्यानंतर मुंबई विद्यापीठाने प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांचे वेळापत्रक शुक्रवारी जाहीर केले. यानुसार शनिवार ३१ मेपासून महाविद्यालयात प्रवेश अर्ज उपलब्ध होणार असून, प्रवेशपूर्व आॅनलाइन नोंदणी प्रक्रिया २ जूनपासून सुरू होणार आहे. प्रवेशाची पहिली मेरिट लिस्ट १९ जून रोजी जाहीर होणार आहे. विद्यापीठातील प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाच्या बीए, बीकॉम, बीएस्सी, बीएमएम, बीएसडब्ल्यू, बीएस्सी (आयटी), बीएस्सी (नॉटिकल सायन्स), बीएस्सी (होम सायन्स), बीएस्सी (एव्हिएशन), बीएस्सी (फॉरेन्सिक सायन्स), बीएस्सी (हॉस्पिटॅलिटी स्टडी), बीकॉम (बी अँड आय), बीकॉम (ए अँड एफ), बीकॉम (एफ अँड एम) आणि बीएमएस अशा ४२ अभ्यासक्रमांसाबरोबरच इंजिनीअरिंग, औषधनिर्माणशास्त्र, बीएड, लॉ (५ वर्ष), आर्किटेक्ट या अभ्यासक्रमांसाठी ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या प्रक्रियेनुसार महाविद्यालयात ३१ ते १४ जूनपर्यंत अर्ज मिळणार आहेत, तर २ जूनपासून प्रवेशासाठी बंधनकारक करण्यात आलेल्या आॅनलाइन प्रवेश पूर्व नोंदणी प्रक्रिया सुरू होणार आहे. १६ जूनपर्यंत विद्यार्थ्यांना आॅनलाइन नावनोंदणी करता येईल. १६ ते १९ जून रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना महाविद्यालयात अर्ज भरता येईल. यानंतर प्रवेशाची पहिली मेरिट लिस्ट १९ जून रोजी जाहीर होईल. दुसरी २१ जून आणि तिसरी आणि अखेरची मेरिट लिस्ट २४ जून रोजी जाहीर करण्यात येईल, असे विद्यापीठाने कळविले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Non-prerequisite for FY2 from June 2