म्हाडाच्या घरांसाठी आजपासून नावनोंदणी
By Admin | Updated: April 15, 2015 00:31 IST2015-04-15T00:31:26+5:302015-04-15T00:31:26+5:30
म्हाडाच्या यंदाच्या मुंबईतील ९९७ घरांसाठी उद्या (बुधवार) दुपारी २ पासून इच्छुकांना नावांची नोंदणी करता येणार आहे. त्यासाठी महिनाभराची मुदत आहे.

म्हाडाच्या घरांसाठी आजपासून नावनोंदणी
मुंबई : म्हाडाच्या यंदाच्या मुंबईतील ९९७ घरांसाठी उद्या (बुधवार) दुपारी २ पासून इच्छुकांना नावांची नोंदणी करता येणार आहे. त्यासाठी महिनाभराची मुदत आहे. म्हाडाच्या संकेतस्थळावर नाव नोंदविणाऱ्यांनाच आॅनलाइन अर्ज भरता येणार आहे. अंध व अपंग प्रवर्गासाठी आरक्षित ६६ घरांसाठी नोंदणीही उद्यापासून केली जाणार आहे. २१ एप्रिलपासून आॅनलाइन अर्ज भरता येतील.
दरनिश्चितीच्या गोंधळामुळे आणि त्यानंतर वांद्रे पोटनिवडणुकीच्या आचारसंहितेमुळे लांबणीवर पडलेल्या म्हाडाच्या घरांच्या सोडतीबाबत सोमवारी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. मुंबईतील घरे ही अत्यल्प, अल्प व मध्यम उत्पन्न गटासाठी तर अंध व अपंग प्रवर्गातील चारही गटांचा समावेश आहे. याबाबतची सविस्तर माहिती प्राधिकरणाच्या www.mhada.maharashtra.gov.in, mhada.gov.in, lottery.mhada.gov.in या संकेतस्थळावर पाहता येईल. नोंदणीसाठी दुपारी २ वाजल्यापासून ते १४ मे रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत मुदत आहे. तर नोंदणीकृत आॅनलाइन अर्ज २१ एप्रिल दुपारी २ वाजल्यापासून ते २० मे सायंकाळी ६पर्यंत भरता येतील. आॅनलाइन अनामत रक्कम न भरणाऱ्यांना अॅक्सिस बॅँकेत अर्ज व डी.डी. स्वीकृतीसाठी २१ एप्रिल ते २० मेपर्यंत मुदत आहे. (प्रतिनिधी)