मनपाचा क्रीडा महोत्सव सुरू
By Admin | Updated: August 6, 2014 00:30 IST2014-08-06T00:30:20+5:302014-08-06T00:30:20+5:30
महानगर पालिका आयोजित जिल्हा स्तरीय शालेय क्र ीडा स्पर्धांना मंगळवारपासून सुरुवात झाली. या महोत्सवादरम्यान विविध क्रीडा स्पर्धा होणार

मनपाचा क्रीडा महोत्सव सुरू
नवी मुंबई : महानगर पालिका आयोजित जिल्हा स्तरीय शालेय क्र ीडा स्पर्धांना मंगळवारपासून सुरुवात झाली. या महोत्सवादरम्यान विविध क्रीडा स्पर्धा होणार असून त्यामध्ये 124 शाळांमधील सुमारे 12 हजार विद्याथ्र्यांनी सहभाग घेतला आहे.
क्र ीडाप्रेमी विद्याथ्र्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेतर्फे या क्र ीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार यंदाच्या महोत्सवाला मंगळवारपासून सुरुवात झाली. महापौर सागर नाईक यांच्या हस्ते वाशीतील नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन येथे या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महापालिका क्षेत्नातील क्र ीडापटूंनी राज्य व राष्ट्रीय स्तरावर स्वत:ची गुणवत्ता सिद्ध केली असल्याची भावना महापौर सागर नाईक यांनी व्यक्त केली. तर येत्या काळात अशा गुणवंत क्रीडापटूंकडे विशेष लक्ष दिले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. लवकरच घणसोली येथे क्रीडा संकुल उभारले जाणार असून त्यामध्ये सर्वप्रकारच्या खेळांना प्राधान्य दिले जाणार असल्याचेही महापौर म्हणाले. महाराष्ट्र राज्य क्र ीडा व युवक सेवा संचालनालय आणि जिल्हा क्र ीडा परिषद ठाणो यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिका क्रीडा विभागाच्या वतीने हा महोत्सव होत आहे. त्यामध्ये 124 शाळांतील 12 हजारहून अधिक विद्यार्थी खेळाडू या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत सहभागी झाले आहेत. या स्पर्धेमुळे गेल्या तीन वर्षात नवी मुंबई क्षेत्नातून राष्ट्रीय स्तरावर खेळणा:या खेळाडूंच्या संख्येत वाढ होत आहे. सन 2क्11-12 मध्ये 28 खेळाडू, सन 2क्12-13 मध्ये 32 खेळाडू व सन 2क्13-14 मध्ये 79 खेळाडूंनी राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धामध्ये लक्षणीय कामगिरी केलेली आहे. या वर्षीच्या स्पर्धाच्या उद्घाटन प्रसंगी विरोधी पक्षनेत्या सरोज पाटील, नगरसेवक विक्रम शिंदे, वैभव गायकवाड, उप आयुक्त दादासाहेब चाबुकस्वार, तसेच क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)