Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईच्या तीन प्रवेशद्वारांवर एक महिना टोल नाही; छोट्या गाड्यांना मोठा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2018 16:28 IST

मुंब्रा बायपास रोडचं काम सुरू असल्यानं मुंबईतल्या प्रवेशद्वारावर असलेल्या तीन टोलनाक्यांवर सूट देण्यात आली आहे. मुलुंड येथील दोन आणि ऐरोलीमधील एका टोलनाक्यांवर सूट देण्यात आली आहे. 

मुंबई : मुंब्रा बायपास रोडचं काम सुरू असल्यानं मुंबईतल्या प्रवेशद्वारावर असलेल्या तीन टोलनाक्यांवर सूट देण्यात आली आहे. मुलुंड येथील दोन आणि ऐरोलीमधील एका टोलनाक्यांवर सूट देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना होत असलेल्या प्रचंड त्रासामुळे हा निर्णय घेण्यात आला.

या तिन्ही टोलनाक्यावर वाहनांना महिन्याभरासाठी टोलमधून सूट देण्यात येणार आहे. परंतु ही सूट छोट्या वाहनांसाठीच लागू असल्याचंही महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. मुंबईच्या प्रवेशद्वारावर असलेले मुलुंडचे दोन आणि ऐरोलीच्या एका टोलनाक्यावर 21 ऑगस्ट ते 23 सप्टेंबर छोट्या वाहनांकडून टोल घेतला जाणार नाही. 

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ऐरोली, मुलुंड टोलनाका बंद करावा, अशी मागणी केली होती. तसेच, त्यांनी स्वत: या टोलनाक्यावरील टोलवसुलीही बंद पाडली होती.

टॅग्स :टोलनाकाठाणेमुंबई