सुट्ट्या पैशांसाठी अडणार नाही तिकीट
By Admin | Updated: March 3, 2015 01:40 IST2015-03-03T01:40:50+5:302015-03-03T01:40:50+5:30
सुट्ट्या पैशांच्या चणचणीमुळे अनेकदा प्रवाशांना तिकीट मिळवताना खिडकीवरील कर्मचाऱ्याशी वाद घालावा लागतो आणि यामुळे तिकीट मिळण्यास विलंब होतो,

सुट्ट्या पैशांसाठी अडणार नाही तिकीट
मुंबई : सुट्ट्या पैशांच्या चणचणीमुळे अनेकदा प्रवाशांना तिकीट मिळवताना खिडकीवरील कर्मचाऱ्याशी वाद घालावा लागतो आणि यामुळे तिकीट मिळण्यास विलंब होतो, मात्र आता मध्य रेल्वेवरील प्रवाशांची यातून सुटका होणार आहे. लवकरच ३१ स्थानकांवर कॉइन तिकीट व्हेंडिंग मशिन बसविण्यात येणार आहे. पाच रुपये किंवा दहा रुपये या मशिनमध्ये टाकल्यास प्रवाशाला मशिनमधून तिकीट मिळेल.
मध्य रेल्वेने काही महिन्यांपूर्वी सीएसटी स्थानकात प्रायोगिक तत्त्वावर कॉइन व्हेंडिंग मशिन बसविले होते. त्याला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाल्यानंतर त्यामध्ये आणखी काही बदल करण्याचा निर्णय घेत हे मशिन सीएसटी स्थानकातून काढण्यात आले. आता पुन्हा एकदा हे मशिन मध्य रेल्वेच्या स्थानकांवर आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे अर्थसंकल्पात देशभरातील रेल्वे स्थानकांवर ४०० कॉइन तिकीट व्हेंडिंग मशिन बसविण्यात येणार असल्याचे रेल्वेमंत्र्यांकडून सांगण्यात आले. सुरुवातीला मध्य रेल्वेच्या ३१ स्थानकांवर साधारपणे ४० मशिन्स बसविण्यात येणार आहेत. पाच-दहा रुपयांची नाणी टाकून तिकीट मिळवता येईल.
एक्सप्रेस गाड्यांमधून प्रवास करताना प्रवाशांना अनेक वेळा डब्यातील अस्वच्छतेला सामोरे जावे लागते. अशावेळी तक्रार करायची तरी कुठे असा प्रश्न प्रवाशांना पडतो. हा प्रश्न सोडविण्यासाठी आता मध्य रेल्वेने एसएमएस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
१२ गाड्यांसाठी ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. तक्रार करण्यासाठी मध्य रेल्वेकडून ६६६.ू’ींल्ले८ूङ्मंूँ.ूङ्मे ही वेबसाईट उपलब्ध करुन दिली आहे. स्मार्ट फोन किंवा लेपटॉपजवळ बाळगणाऱ्या प्रवाशांना इंटरनेटमार्फत या वेबसाईटवर जाता येईल. त्यासाठी ‘‘ू’ींल्ल <२स्रंूी>< 10 ्िरॅ्र३ स्रल्ल१ ल्ल४ेुी१ > टाईप करुन ५८८८८वर एसएमएस करावा. हा एसएमएस संबंधित सफाई कर्मचाऱ्यांना जाईल आणि त्याची दखल घेऊन डब्यातील तसेच टॉयलेटमधील सफाई करण्यात येईल.
सेवा दादर-पॉडेचेरी एक्सप्रेस, एलटीटी ते कॉईम्बतुर, दादर-तिरुनेलवेली, मुंबई-चेन्नई सेन्ट्रल मेल, मुंबई-चैन्नई सेन्ट्रल, दादर-म्हैसूर शारावती, दादर-करमाळी जनशताब्दी, मुंबई-मेंगलोर जनशताब्दी, मुंबई-फिरोजपुर पंजाब मेल, मुंबई-राजेन्द्रनगर, दादर-चैन्नई इग्मोर चैन्नई, एलटीटी-एर्नाकुलम दुरोन्तो एक्सप्रेसमध्ये देण्यात येत आहे.