Join us
Daily Top 2Weekly Top 5

ब्रह्मांड जंक्शनपासून टिकुजीनीवाडीतील मेट्रो स्थानकापर्यंत जाताना ‘नो टेन्शन’

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 08:18 IST

पादचारी पुलासाठी गर्डरची यशस्वी उभारणी

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई :   ठाण्यातील ब्रह्मांड जंक्शन ते टिकुजीनीवाडीतील मेट्रो स्थानकाला जोडणाऱ्या पादचारी पुलाचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) पूर्णत्वास नेले आहे. या  पुलासाठी शेवटच्या २५२ मेट्रिक टनाच्या चार गर्डर्सची उभारणी एमएमआरडीएने यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे.

एमएमआरडीएने घोडबंदर रोडवरील व्यस्त वाहतूक, तसेच मेट्रो व्हायाडक्ट असलेल्या भागात अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत हा प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. त्यासाठी एमएमआरडीएने २५० मेट्रिक टन क्षमतेच्या दोन क्रेन्स, ८०० मेट्रिक टन क्षमतेची एक क्रेन, १५ एमटी क्षमतेच्या चार सहायक क्रेन्स वापरण्यात आल्या. तसेच या कामासाठी एमएमआरडीएने तब्बल ६० हून अधिक अभियंते, पर्यवेक्षक आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांचे पथक तैनात केले होते. त्यामुळे आव्हानात्मक असलेले हे काम विनाअडथळा पार पडले. 
या प्रकल्पात एमएमआरडीए चार गर्डरची उभारणी सर्वाधिक वर्दळीच्या वाहतूक मार्गावर केली.

प्रवास होणार सुखकर
हे गर्डर जमिनीपासून ६.१ मीटर उंचीवर यशस्वीरीत्या उभारण्यात आले. या प्रत्येक गर्डरची लांबी ५९.६३ मीटर एवढी होती, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 
त्यातून आता या वर्दळीच्या भागात मेट्रो स्थानकावर जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Seamless Commute: Footbridge Connects Thane's Key Points, Easing Metro Access

Web Summary : MMRDA completes the crucial footbridge connecting Brahmand Junction to Tikuji-ni-Wadi metro station in Thane. This challenging project ensures smoother, safer metro access for commuters, easing traffic congestion in the busy Ghodbunder Road area. The successful installation of girders marks a significant milestone.
टॅग्स :मुंबई