भाडे नाकारण्याचा अधिकार नाही
By Admin | Updated: December 9, 2014 03:00 IST2014-12-09T03:00:07+5:302014-12-09T03:00:07+5:30
ज्यादा भाडे घेण्याबरोबरच भाडे नाकारण्याच्या होणा:या प्रकारांमुळे टॅक्सी आणि रिक्षा प्रवाशांना मोठय़ा मनस्तापाला सामोरे जावे लागते.

भाडे नाकारण्याचा अधिकार नाही
मुंबई : ज्यादा भाडे घेण्याबरोबरच भाडे नाकारण्याच्या होणा:या प्रकारांमुळे टॅक्सी आणि रिक्षा प्रवाशांना मोठय़ा मनस्तापाला सामोरे जावे लागते. याविरोधात वाहतूक पोलिसांकडून कारवाई करूनही हा उद्दामपणा कमी होताना दिसत नाही. तरीही भाडे नाकारण्याचा अधिकार मिळावा, यासाठी टॅक्सी युनियन झटत आहेत. त्यासाठी प्राधिकरण आणि कोर्टातही दाद मागण्याची तयारी दाखवली आहे. मात्र भाडे नाकारण्याचा अधिकार कदापि मिळणार नाही, असे स्पष्टपणो राज्याचे परिवहन सचिव शैलेश कुमार शर्मा यांनी सांगितले आहे.
मुंबई शहर आणि उपनगरांत मोठय़ा प्रमाणात रिक्षा आणि टॅक्सी धावतात. या सेवांचा लाभ घेणारा प्रवासीवर्ग खूप मोठा आहे. मात्र भाडे नाकारणो, ज्यादा भाडे घेणो यामुळे प्रवासी त्रस्त होत असून, त्याविरोधात वाहतूक पोलिसांकडे मोठय़ा प्रमाणात तक्रारीही येतात. अशा टॅक्सी आणि रिक्षाचालकांविरोधात वाहतूक पोलिसांकडून कारवाईदेखील केली जाते. 2014 च्या जानेवारी ते ऑक्टोबर महिन्यार्पयत भाडे नाकारण्याच्या 6 हजार 905 केसेस दाखल झाल्या असून, दंडात्मक कारवाईतून 50 हजार 100 रुपये वसूल करण्यात आले आहेत. तर ज्यादा भाडे आकारणीच्या या 1क् महिन्यांत 213 केसेस दाखल झाल्या असून, 6 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. असे असूनही मुंंबई टॅक्सीमेन्स युनियनने रविवारी झालेल्या टॅक्सीचालकांच्या मेळाव्यात भाडे नाकारण्याचा अधिकार चालकांना मिळावा, अशी अजब मागणी केली आहे. यामध्ये सायंकाळी पाच ते आठ या वेळेत चालक शिफ्ट बदलतात आणि त्यासाठी घरच्या दिशेने जात असतात. त्यामुळे या वेळेत भाडे नाकारण्याचा अधिकार मिळावा, अशी मागणी मेळाव्यातून केली. मात्र असा अधिकार मिळणार नाही, असे स्पष्टपणो परिवहन सचिव शैलेश कुमार शर्मा यांनी सांगितले. याचा फटका प्रवाशांना मोठय़ा प्रमाणात बसणार असून, त्यामुळे असा कुठलाही निर्णय घेतला जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच दुपारी 1 ते 2 या वेळेत लंच ब्रेक हवा अशी मागणीही टॅक्सी युनियनने केली आहे. याविषयी टॅक्सी युनियनकडून परिवहन विभागाकडे अद्याप मागणी आली नसल्याचेही शर्मा यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
रिक्षा, टॅक्सी
चालकांच्या तक्रारी
भाडे नाकारणो
सप्टेंबर : 966 केसेस, 2000 रु. दंड
ऑक्टोबर : 276 केसेस आणि 27,600 दंड
जानेवारी ते ऑक्टोबर एकूण 6,905 केसेस आणि 50 हजार 100 दंड
जादा भाडे आकारणो
सप्टेंबर : 43 केसेस, 3,400 दंड
ऑक्टोबर : 6 केसेस आणि 600 दंड जानेवारी ते ऑक्टोबर : 213 केसेस आणि 6 हजार दंड
दिल्लीत टॅक्सी चालकाने 25वर्षीय तरुणीवर शस्त्रच्या धाकाने केलेल्या बलात्काराची पुनरावृत्ती मुंबईत होऊ नये यासाठी मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी मेरू, कूल कॅब अशा खासगी कंपन्यांमधील टॅक्सी चालकांच्या झाडाझडतीचे आदेश पोलीस ठाण्यांना दिले आहेत. महिन्याभरात या कंपन्यांच्या टॅक्सीचालकांची पाश्र्वभूमी तपासली जाणार आहे.
गुन्हेगारी पाश्र्वभूमीच्या चालकांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाईल. गंभीर गुन्हयांची पाश्र्वभूमी असलेल्यांविरोधात तडीपारीची कारवाई केली जाईल किंवा चालक परवाना रद्द केला जाईल. किरकोळ गुन्हा असल्यास त्यांच्याकडून गुन्हा करणार नाही, असे लेखी लिहून घेतले जाईल.
मेरू, टॅब, कूल कॅब अशा खासगी कंपन्यांकडून टॅक्सीचालकांची यादी मागवून ती पोलीस ठाण्यांच्या
हाती दिली जाईल. यावर स्थानिक उपायुक्त देखरेख ठेवतील,
अशी माहिती पोलीस दलाचे प्रवक्ते धनंजय कुलकर्णी यांनी दिली.
साध्या टॅक्सी चालकांचाही ठेवणार रेकॉर्ड?
दिल्लीची पुनरावृत्ती मुंबईत घडू नये यासाठी शहरातील साध्या (काळया-पिवळया) टॅक्सी चालकांचाही रेकॉर्ड ठेवण्याच्या विचारात पोलीस आहेत. खासगी टॅक्सी चालकांप्रमाणोच त्यांचीही गुन्हेगारी पाश्र्वभूमी तपासली जाऊ शकते.