पश्चिम मार्गावर दिवसा मेगाब्लॉक नाही, मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:06 IST2021-04-03T04:06:45+5:302021-04-03T04:06:45+5:30

मुंबई : मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर देखभाल काम करण्यासाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. दरम्यान पश्चिम रेल्वे मार्गावर ...

No megablocks during the day on the western route, no megablocks on the central, harbor railway line on Sundays | पश्चिम मार्गावर दिवसा मेगाब्लॉक नाही, मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

पश्चिम मार्गावर दिवसा मेगाब्लॉक नाही, मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

मुंबई : मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर देखभाल काम करण्यासाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. दरम्यान पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी मध्यरात्री मेगाब्लॉक घेतला जाणार असल्याने प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

मध्य रेल्वे मार्गावर ठाणे-कल्याण अप व डाउन धिम्या मार्गावर सकाळी ११.०० ते संध्याकाळी ४.०० पर्यंत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. मुलुंड येथून सकाळी १०.४६ ते दुपारी ३.४६ पर्यंत सुटणाऱ्या डाउन धिम्या व अर्धजलद मार्गावरील सेवा मुलुंड ते कल्याण स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळविण्यात येतील. या सेवा ठाणे, दिवा आणि डोंबिवली या स्थानकांवर थांबतील आणि वेळापत्रकापेक्षा १० मिनिटे उशिराने पोहोचतील. कल्याण येथून सकाळी १०.३७ ते दुपारी ३.५१ या वेळेत सुटणाऱ्या धिम्या/अर्धजलद अप मार्गावरील सेवा कल्याण व मुलुंड स्थानकांदरम्यान अप फास्ट मार्गावर वळविल्या जातील आणि डोंबिवली, दिवा आणि ठाणे स्थानकांवर थांबतील, पुढे मुलुंडला अप धिम्या मार्गावर वळविण्यात येतील आणि वेळापत्रकापेक्षा १० मिनिटे उशिराने पोहोचेल. ब्लॉककाळात कळवा, मुंब्रा, कोपर आणि ठाकूर्ली स्थानकांवर उपनगरी सेवा उपलब्ध होणार नाहीत.

हार्बर रेल्वे मार्गावर पनवेल - वाशी अप व डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते संध्याकाळी ४.०५ पर्यंत (नेरुळ / बेलापूर-खारकोपर हार्बर लाईनसह) मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.०३ ते दुपारी ३.१६ दरम्यान पनवेल / बेलापूर करीता सुटणारी व अप हार्बर मार्गावर पनवेल / बेलापूर येथून सकाळी १०.४९ ते सायंकाळी ४.०१ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करीता सुटणारी सेवा रद्द राहतील. ट्रान्सहार्बर मार्गावर पनवेल येथून सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ या वेळेत ठाणेकडे जाणाऱ्या तर ठाणे येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० दरम्यान पनवेलला जाणाऱ्या सेवा रद्द असतील. ब्लॉककाळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कुर्ला विभागात विशेष गाड्या चालविल्या जातील तर ठाणे-वाशी / नेरूळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा उपलब्ध असेल.

पश्चिम रेल्वे मार्गावर वसईरोड ते विरार दरम्यान रविवारी धिम्या मार्गावर रात्रकालीन चार तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे. ४ एप्रिल रोजी ००.३० ते ४.३० या वेळेत मेगाब्लॉक असणार आहे. यावेळेत धिम्या मार्गावरील गाड्या जलद मार्गावर चालवल्या जाणार आहेत. रविवारी दिवसा मेगाब्लॉक नसल्याने प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

Web Title: No megablocks during the day on the western route, no megablocks on the central, harbor railway line on Sundays