Join us  

Corona In Dharavi: धारावीचा षटकार; दिवसभरात एकही कोरोना बाधित नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2021 8:03 PM

Corona In Dharavi: धारावी परिसरात तर तब्बल सहावेळा शून्य बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. शनिवारी या विभागात एकही बाधित रुग्ण सापडला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्क 

मुंबई - कोरोनाचा प्रसार मुंबईत आता पूर्णपणे नियंत्रणात आला आहे. धारावी परिसरात तर तब्बल सहावेळा शून्य बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. शनिवारी या विभागात एकही बाधित रुग्ण सापडला नाही. तसेच सध्या २१ सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत. (Maharashtra: No new case of #COVID19 reported in Mumbai's Dharavi today; active cases in the area stand at 21, says Brihanmumbai Municipal Corporation)

आशिया खंडातील मोठ्या झोपडपट्ट्यांपैकी एक असलेल्या धारावीमध्ये एप्रिल २०२० मध्ये कोरोनाचा संसर्ग झाला. मात्र यातूनच आकार घेणाऱ्या धारावी पॅटर्नने कोरोनाचा प्रसार रोखला. तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यातही धारावी पॅटर्न प्रभावी ठरले आहे. जास्तीतजास्त लोकांची चाचणी, बाधितांचे संपर्कातील लोकांना शोधणे, तात्काळ विलगीकरण आणि त्वरित उपचार हे चार सूत्रे पालिकेने येथे कायम ठेवली आहे. 

दुसऱ्या लाटेदरम्यान धारावी परिसरातील इमारतींमध्ये रुग्णांची संख्या वाढली होती. मात्र संपूर्ण धारावी परिसरात पुन्हा एकदा सर्व नागरिकांची चाचणी करण्यात आली. तसेच प्रभावी उपाययोजनांमुळे धारावीमध्ये बाधित रुग्णांची संख्या अत्यंत कमी आहे. शनिवारी धारावी परिसरात चाचणी करण्यात आलेल्या नागरिकांमध्ये एकही कोरोना बाधित नसल्याचे दिसून आले. 

* यापूर्वी जानेवारी महिन्यात २२, २६, २७, ३१ जानेवारी आणि २ फेब्रुवारीत धारावीमध्ये शून्य रुग्णांची नोंद झाली होती. 

* दुसऱ्या लाटेत धारावीत झोपडपट्ट्यांमध्ये नव्हे तर इमारतींमध्ये रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसून आले. मात्र पुन्हा उपायोजनानंतर कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आला आहे. यापूर्वी १४, १५, २३ जून आणि ४, ७ जुलै रोजी शून्य रुग्णांची नोंद झाली आहे.

आतापर्यंत रुग्ण संख्या 

परिसर....एकूण....सक्रिय....डिस्चार्ज...आजची स्थिती 

दादर....९८०५....१४४.....९४७७.... ०४

धारावी....६९३२....२१....६५५२... ००

माहीम....१०१२७....७२....९८५३.... ०६

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना सकारात्मक बातम्या