Join us
Daily Top 2Weekly Top 5

दिशा आणि सुशांतच्या आत्महत्येत कनेक्शन?; पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2020 06:37 IST

सुशांतची पूर्व मॅनेजर दिशा सालीयनने काही दिवसांपूर्वीच आत्महत्या केली

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत (३२) याच्या आत्महत्येमुळे खळबळ उडाली आहे. त्याने हे टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत चौकशी सुरू आहे. दरम्यान, त्याची पूर्व मॅनेजर दिशा सालीयन (२८) हिने काही दिवसांपूर्वीच केलेल्या आत्महत्येशी त्याचा काही संबंध नाही, असे तपास अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.दिशा आणि सुशांत हे ऐकमेकांचे चांगले मित्र होते. तिने आत्महत्या केल्याच्या आठवडाभरानंतर सुशांतने आत्महत्या केल्याने यात काही कनेक्शन आहे का, हे पडताळून पाहिले जात आहे. मात्र, सध्या तरी अशी कोणतीही बाब समोर आली नसल्याचे तपास अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. दिशाचे सुशांतशी मार्चमध्ये शेवटचे बोलणे झाल्याचे समजते. मात्र, त्यानंतर ते दोघे संपर्कात नसल्याचे तपासात समोर आले आहे. आत्महत्या करण्यासाठी त्याला कोणी प्रवृत्त केले का, हे तपासण्यासाठी त्याचे मित्र, नातेवाईक यांचे जबाब नोंदविण्याचे काम पोलीस करीत आहेत.जवळची मैत्रीण रिया चक्रवती हिच्याशी नोव्हेंबरमध्ये त्याचा विवाह होणार होता. तिच्यासोबत त्याचे खटके उडत होते का? ही बाबही पोलिसांकडून पडताळून पाहिली जात आहे.चंद्रावर घेतली होती जागासुशांतच्या वागण्यात गेल्या चार महिन्यांपासून बदल झाल्याचे त्याच्या निकटवर्तीयांनी पोलिसांना सांगितले. त्याला आर्थिक अडचण नसल्याचेही त्याच्या बँक अकाउंटच्या स्टेटमेंटनुसार स्पष्ट झाले आहे. त्याला चंद्रावर जायचे होते. त्यासाठी त्याने काही वर्षांपूर्वी चंद्रावरील सी ऑफ मस्कॉवी रिजनमधील जमिनीचा एक तुकडाही खरेदी केला होता. इन्स्टाग्राम अकाउंटवर आपली चंद्रावरची जागा त्याने दाखविली होती. गरीब मुलांचे शिक्षण आणि संगोपनाची जबाबदारी त्याला उचलायची होती. मात्र त्याला ते करता येत नसल्याचीही खंत होती.‘जर गॅलरीतून उडी मारली तर...’सुशांतची एक मॉडेल मैत्रीण त्याला वांद्रे येथील घरात भेटली होती. घराच्या गॅलरीत उभे राहून गप्पा मारताना, ‘या गॅलरीतून उडी मारली तर कसे वाटेल?’ असा प्रश्न त्याने तिला विचारला आणि त्यानंतर त्याच विषयावर त्यांची चर्चा झाल्याचे तिने एका इन्स्टाग्राम पोस्टमार्फत शेअर केले आहे.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूत