Join us  

घोळ अन् बट्ट्याबोळ; शिवसेनेचा 'तो' व्हिप भाजपा कार्यालयात झाला टाईप!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2018 9:24 AM

अविश्वासदर्शक ठरावाच्यावेळी मतदानात भाग घेण्याबाबत तयार केला गेलेला व्हीप भाजपा संसदीय पक्षाच्या कार्यालयात टाईप करून घेण्याची दोन खासदारांची चूक पक्षाला भोवली

संदीप प्रधानमुंबई - लोकसभेत नरेंद्र मोदी सरकारवर आलेल्या अविश्वासदर्शक ठरावाच्यावेळी मतदानात भाग घेण्याबाबत तयार केला गेलेला व्हीप भाजपा संसदीय पक्षाच्या कार्यालयात टाईप करून घेण्याची दोन खासदारांची चूक पक्षाला भोवली. या चुकीमुळे शिवसेनेनी अगोदर मतदानात भाग घेण्याच्या आपल्या भूमिकेपासून घूमजाव केल्याचा गैरसमज निर्माण झाला.

अविश्वासदर्शक ठरावावर शिवसेनेची भूमिका निश्चित होण्यापूर्वी खासदारांना हजर राहण्याबाबतचा व्हीप दोन सेना खासदारांनी भाजपा संसदीय पक्षाच्या कार्यालयात तयार केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. शिवसेनेच्या कार्यालयात पत्र तयार करण्याची सोय नसल्याने हे घडले. मात्र, त्यामुळेच शिवसेनेनी बहिष्काराचा निर्णय जाहीर करताच भाजपा कार्यालयाच्या संगणकातील व्हीपचे पत्र सोशल मीडियावर जाहीर करण्याची संधी त्या पक्षाला चालून आली.शिवसेनेच्या ज्या दोन खासदारांकडून ही चूक झाली त्यापैकी एक मुंबईतील असून दुसरे विदर्भातील असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे यासंदर्भात चंद्रकांत खैरे यांच्यावर झालेले आरोप बिनबुडाचे आहेत. मात्र, या खासदारद्वयींवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असेही समजते.

टॅग्स :अविश्वास ठरावभाजपालोकसभाचंद्रकांत खैरे