‘युती नाही, निदान तडजोड तरी करा!’

By Admin | Updated: September 30, 2014 00:34 IST2014-09-30T00:34:26+5:302014-09-30T00:34:26+5:30

रिपब्लिकन नेत्यांनी युती करता येत नसेल तर निवडणुकीच्या 15 दिवसांसाठी किमान तडजोड करीत एकत्र येण्याचे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) पक्षाचे सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई यांनी केले आहे.

'No alliance, do the diagnosis!' | ‘युती नाही, निदान तडजोड तरी करा!’

‘युती नाही, निदान तडजोड तरी करा!’

>मुंबई : रिपब्लिकन नेत्यांनी युती करता येत नसेल तर निवडणुकीच्या 15 दिवसांसाठी किमान तडजोड करीत एकत्र येण्याचे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) पक्षाचे सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई यांनी केले आहे. सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे आवाहन केले आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गवई यांना शुक्रवारी राजकीय चर्चेसाठी मातोश्रीवर बोलावल्याचा दावा गवई यांनी केला आहे. किमान 5क् उमेदवारांना महाशक्तीने एबी फॉर्म वाटल्याने तितक्या जागा मिळण्याची मागणी शिवसेनेकडे केल्याचे त्यांनी सांगितले. मात्र ही अवास्तव मागणी ठाकरे यांनी अमान्य केल्याचा दावाही गवई यांनी केला आहे. शिवाय एकाकी पडलेल्या उद्धव ठाकरे यांच्याकडून मंत्रिपदाच्या आशेसाठी कार्यकत्र्याची तिलांजली 
देण्याचा प्रस्ताव नाकारल्याचे त्यांनी सांगितले.
याउलट सर्वच पक्ष एकाकी लढत असल्याने रिपब्लिकन नेत्यांनी एकत्र येण्याची हीच योग्य वेळ असल्याचे ते म्हणाले. मुस्लीम, दलित आणि ओबीसी मतदारांचे नेतृत्व करणा:या रिपाइं (ए)चे अध्यक्ष व खासदार रामदास आठवले, रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर आणि भारिप- बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर यांनी महाशक्तीसोबत एकत्र येण्याचे आवाहन गवई यांनी केले. 
त्यात एका पक्षाच्या सक्षम उमेदवाराला अन्य पक्ष मदत करतील, असा सुवर्णमध्य गवई यांनी सुचविला आहे. कारण 2क् ते 25 हजार मते मिळवूनही रिपब्लिकन उमेदवार विजयी ठरू शकतील, असा दावा गवई यांनी केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 'No alliance, do the diagnosis!'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.