महापालिका बनविणार हवेतून पाणी

By Admin | Updated: August 12, 2015 03:31 IST2015-08-12T03:31:50+5:302015-08-12T03:31:50+5:30

मुंबईतील पाणीटंचाई दूर करण्यासाठी महापालिकेने राबविलेल्या योजना अपयशी ठरल्यानंतर महापालिका आता हवेतील आर्द्रता शोषून पाणी निर्माण करण्याचा प्रयोग करणार आहे. ही मशीन

NMC to make water from air | महापालिका बनविणार हवेतून पाणी

महापालिका बनविणार हवेतून पाणी

मुंबई : मुंबईतील पाणीटंचाई दूर करण्यासाठी महापालिकेने राबविलेल्या योजना अपयशी ठरल्यानंतर महापालिका आता हवेतील आर्द्रता शोषून पाणी निर्माण करण्याचा प्रयोग करणार आहे. ही मशीन पालिका रुग्णालये व शाळांत उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. हा पाणी प्रकल्प महापालिकेला प्रचंड महागडा ठरणार असल्याने विरोधी पक्षनेत्यांनी याला विरोध केला आहे.
स्काय वॉटर व एअर वॉटर या कंपन्यांनी गटनेत्यांच्या बैठकीत या प्रकल्पाचे सादरीकरण केले. त्यानुसार एक लिटर पाणी निर्माण होण्यासाठी सव्वा ते दीड रुपया असा पाण्याचा दर असणार आहे. हा संपूर्ण खर्च पालिका उचलणार आहे. मुंबईला पुरविण्यात येणाऱ्या पाण्यासाठी सध्या एक हजार लिटरसाठी सव्वा चार रुपये खर्च येतो. त्यापेक्षा हवेतील पाण्याचा खर्च जास्त असताना तो पालिकेला परवडणार कसा हा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे या प्रकल्पाला विरोधकांकडून तीव्र विरोध होण्याची शक्यता आहे.

नजर निवडणुकीवर : आगामी निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी विविध कल्पना समोर आणत आहेत. स्काय वॉटर व एअर वॉटर या दोन कंपन्यांनी गटनेत्यांच्या बैठकीत या प्रकल्पाचे नुकतेच सादरीकरण केले.

Web Title: NMC to make water from air

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.