Join us
Daily Top 2Weekly Top 5

नऊ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2019 06:20 IST

राज्य पोलीस दलामध्ये कार्यरत पोलीस उपायुक्त आणि पोलीस अधीक्षक दर्जाच्या ९ अधिकाऱ्यांच्या बदली आणि नवनियुक्तीचे आदेश गृहमंत्रालयाने शुक्रवारी काढले आहेत.

मुंबई : राज्य पोलीस दलामध्ये कार्यरत पोलीस उपायुक्त आणि पोलीस अधीक्षक दर्जाच्या ९ अधिकाऱ्यांच्या बदली आणि नवनियुक्तीचे आदेश गृहमंत्रालयाने शुक्रवारी काढले आहेत.या आदेशात नवी मुंबई पोलीस मुख्यालयातील पोलीस उपायुक्त विनीता साहू यांची नागपूर शहर पोलीस दलात बदली करण्यात आली असून त्यांच्या रिक्त जागेवर ‘दक्षता’/ ‘धोरण’चे मुख्य संपादक सहायक विशेष पोलीस महानिरीक्षक शिवराज पाटील यांची नियुक्ती करण्यातआली आहे.नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या वीरेंद्र मिश्रा यांची पुणे पोलीस दलात पोलीस उपायुक्त पदावर नेमणूक करण्यात आली आहे. तर, मनोज पाटील यांची राज्य नियंत्रण कक्षाच्या पोलीस अधीक्षक पदावर नेमणूक केली आहे.वडसा-देसाईगंज येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १३ चे समादेशक श्रीधर जी. यांची नागपूर येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ४ येथे समादेशक पदावर बदली करण्यात आली आहे.श्रीधर जी. यांंची बदली करण्यात आल्यामुळे त्यांच्या जागी गोंदियाचे अप्पर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांची तर बदली झाल्यामुहे पिंगळे यांच्या रिक्त राहिलेल्या जागेवर अकोल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची नेमणूक करण्यात आल्याचे गृहमंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.नागपूर येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ४ येथे समादेशक श्रीकृष्ण कोकाटे यांची ठाण्यातील नागरी हक्क संरक्षणचे पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर, अहमदनगरच्या अप्पर पोलीस अधीक्षक दीपाली काळे (कांबळे) यांची येथील श्रीरामपूर विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती केली आहे.