Join us
Daily Top 2Weekly Top 5

कांदिवली पूर्वेकडच्या जानुपाडा परिसरातल्या घरात स्फोट होऊन नऊ जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2020 08:57 IST

कांदिवली पूर्वेकडच्या जानुपाडा परिसरात मध्यरात्री एकाच्या घरात सिलिंडरचा स्फोट झाला आहे.

मुंबई- कांदिवली पूर्वेकडच्या जानुपाडा परिसरात मध्यरात्री एकाच्या घरात सिलिंडरचा स्फोट झाला आहे. या स्फोटाच्या आवाजानं आजूबाजूच्या परिसरात खळबळ उडाली आहे. या स्फोटाची झळ बाजूच्या घरांनाही बसली आहे. या स्फोटात शारदा नामदेव कानडे (वय 56 वर्ष), संदीप नामदेव कानडे (वय 31 वर्ष), ओंकार दत्तात्रय चीके (वय 18 वर्ष), मेहुल सूरती (वय 30 वर्षे), जयेश सुतार (वय 30 वर्षे), दिवेश पटेल (वय 22 वर्ष), राजेश रणछोड दुबला (वय 40 वर्ष), निशांत तुषार पांचाळ (वय 11 वर्ष), दिव्यानी सुरती (वय 47 वर्षे) जखमी झाले आहेत. कांदिवली पूर्वेकडच्या संभाजीनगरमधील जानुपाड्यातील रा.ठी गवारे चाळीत कानडे कुटुंबीय वास्तव्याला आहे. काल मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या घरी गॅस सिलिंडरचा स्फोट झाला, त्यात शेजारील व्यक्तीही किरकोळ जखमी झाले आहेत. सदरचे सर्व जखमी 20 ते 25 टक्के भाजले असून, त्यांच्यावर शताब्दी रुग्णालय उपचार सुरू आहेत. कांदिवली फायर ब्रिगेडचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून, आता परिस्थिती नियंत्रणात आहे.