कर्तव्यात हलगर्जी करणारे नऊ अधिकारी दोषी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 23:58 IST2018-12-01T23:58:25+5:302018-12-01T23:58:28+5:30
मुंबईला गेल्या वर्ष अखेरीस हादरविणाऱ्या कमला मिल कंपाउंड येथील आगीच्या दुर्घटनेचा अंतिम चौकशी अहवाल अखेर सादर झाला आहे.

कर्तव्यात हलगर्जी करणारे नऊ अधिकारी दोषी
मुंबई : मुंबईला गेल्या वर्ष अखेरीस हादरविणाऱ्या कमला मिल कंपाउंड येथील आगीच्या दुर्घटनेचा अंतिम चौकशी अहवाल अखेर सादर झाला आहे. या दुर्घटनेप्रकरणी पालिकेच्या नऊ अधिकाºयांना दोषी ठरविण्यात आले आहे. कमला मिल कंपाउंडमध्ये इज आॅफ डुइंग बिझनेस अंतर्गत अनेक परवानग्या या खातरजमा न करताच देण्यात आल्या होत्या, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. आणखी तीन अधिकाºयांचे चौकशी अहवाल सादर झाल्यानंतर, सर्व १२ अधिकाºयांवरील कारवाईचे स्वरूप निश्चित होणार आहे.
गेल्या वर्षी २९ डिसेंबर रोजी लोअर परळ येथील कमला मिल कंपाउंडमध्ये मोजोस बिस्ट्रो आणि वन अबव्ह या दोन पबमध्ये आगीचा भडका उडाला. या दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला. या घटनेचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटले. प्राथमिक चौकशीत अनेक गैरव्यवहार समोर आल्यानंतर या घटनेची सखोल चौकशी केली.
>हे पाच अधिकारी होते निलंबित
या प्रकरणात बेकायदा बांधकामांवर लक्ष ठेवण्यासाठी नियुक्त अधिकारी मधुकर शेलार, इमारत व कारखाने विभागाचे दुय्यम अधिकारी दिनेश महाले आणि कनिष्ठ अभियंता धनराज शिंदे (नोटीस दिली, मात्र कारवाई नाही), वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सतीश बडगिरे (नोटीस दिली, पण कारवाई नाही), विभागीय अग्निशमन अधिकारी एस. एस. शिंदे (अग्निरोधक यंत्रणेत कमतरता असताना, वन अबव्ह पबला ना हरकत प्रमाणपत्र दिले) अशा पाच अधिकाºयांना तत्काळ निलंबित करण्यात आले होते. तशी नोटीस देण्यात आली होती.
>या अधिकाºयांची चौकशी
सहायक अभियंता मधुकर शेलार आणि मनोहर कुलकर्णी, दुय्यम अभियंता दिनेश महाले, कनिष्ठ अभियंता धनराज शिंदे, सहायक विभागीय अग्निशमन अधिकारी एस.एस.शिंदे, उपकार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. राजेश मदान, अग्निशमन केंद्र अधिकारी राजेंद्र पाटील, स्वच्छता निरीक्षक प्रदीप शिर्के.
अहवाल दहा दिवसांत होणार सादर
नऊ अधिकाºयांचा हा चौकशी अहवाल असून, दोन विभाग अधिकारी आणि एका वैद्यकीय आरोग्य अधिकाºयाच्या चौकशीचा अहवाल पुढील दहा दिवसांत सादर होणार आहे.