महावीरनगर-गोराई रोपवेसाठी नऊ कंपन्यांनी दाखवले स्वारस्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 23:52 IST2020-03-05T23:52:39+5:302020-03-05T23:52:46+5:30
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (एमएमआरडीए) मुख्यालयामध्ये आयोजित केलेल्या निविदापूर्व बैठकीमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराट्रीय नऊ कंपन्यांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेत रोपवे बनवण्यात स्वारस्य दाखवले.

महावीरनगर-गोराई रोपवेसाठी नऊ कंपन्यांनी दाखवले स्वारस्य
मुंबई : मेट्रो-२ ए मार्गिकेवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना शेवटच्या स्थानापर्यंत (लास्ट माईल कनेक्टिव्हिटी) सुविधा देण्यासाठी रोपवे बनवण्यात येणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (एमएमआरडीए) मुख्यालयामध्ये आयोजित केलेल्या निविदापूर्व बैठकीमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराट्रीय नऊ कंपन्यांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेत रोपवे बनवण्यात स्वारस्य दाखवले.
एमएमआरडीएमार्फत महावीर नगर ते गोराईचा रोपवे बनवण्यासाठी सुयोग गुरबक्सनी फुनिक्युलर रोपवेज् लिमिटिड, ट्रिंबल सोलुशन इंडिया, आयटीडी सेमेंटशन इंडिया, कन्वेयर रोपवे सर्विसेस, माथेरान रोपवे, एस्सेल वर्ल्ड ग्रुप, एपीटी इन्फ्राटेक सोलुशन आणि डोप्पेलमेर इंडियासह अन्य एका कंपनीने रोपवे बनविण्यात स्वारस्य दाखविले आहे. निविदापूर्व बैठकीमध्ये कंपन्यांच्या प्रतिनिधींना रोपवेच्या योजनेबाबत विस्तृत माहिती देण्यात आली. दहिसर पश्चिम ते डीएन नगर या मेट्रो-२ ए मार्गिकेवरील महावीरनगर स्थानकापासून गोराईदरम्यान रोपवेची ही सेवा एमएमआरडीएमार्फत सुरू करण्यात येणार आहे. मेट्रो-२ ए ही मार्गिका या वर्षाअखेरपर्यंत सुरू होणार आहे. यामुळे काही महिन्यांमध्येच रोपवेची ही सेवा सुरू करण्याचा एमएमआरडीएचा मानस आहे. यासाठी २६ मार्च २०२०पर्यंत निविदा सादर करण्याची मुदत एमएमआरडीएने दिली आहे.