Join us

कल्याण ते टिटवाळादरम्यान रेल्वेचा रात्रकालीन ब्लॉक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2019 03:41 IST

पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रुझ ते गोरेगाव पाच तासांचा जम्बोब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण ते टिटवाळा रात्रकालीन पॉवर ब्लॉक रविवार, ९ जून रोजी घेण्यात येईल. कल्याण ते टिटवाळा यादरम्यान ९ जून रोजी मध्यरात्री १२ ते पहाटे ३ वाजेपर्यंत पॉवर ब्लॉक असेल. या वेळी रेल्वे रूळ मार्गाची उंची वाढविण्यात येईल.

८ जून रोजी रात्री १० वाजून १६ मिनिटांची सीएसएमटी-कल्याण लोकल, रात्री १०.२४ची सीएसएमटी-कल्याण, रात्री ११.४४ वाजताची सीएसएमटी-टिटवाळा, ९ जून रोजी मध्यरात्री १२.०५ची सीएसएमटी-अंबरनाथ या लोकल रद्द केल्या आहेत. ८, ९ जून रोजी रात्री ०९.०४ मिनिटांची कल्याण-सीएसएमटी लोकल, रात्री ०९.२०ची कल्याण-सीएसएमटी, रात्री १०.०१ वाजताची अंबरनाथ-सीएसएमटी, रात्री १०.०६ मिनिटांची टिटवाळा-सीएसएमटी या लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.

पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रुझ ते गोरेगाव पाच तासांचा जम्बोब्लॉकरेल्वे मार्ग, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड वायर दुरुस्तीसाठी पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रुझ ते गोरेगाव यादरम्यान पाचव्या मार्गिकेवर रविवारी सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत पाच तासांचा जम्बोब्लॉक असेल. ब्लॉकमुळे या मार्गावरील काही लोकल रद्द केल्या आहेत.

टॅग्स :लोकल