नायजेरियनचा पोलिसांवर हल्ला
By Admin | Updated: June 6, 2015 01:48 IST2015-06-06T01:48:48+5:302015-06-06T01:48:48+5:30
बोनकोडे येथे पोलिसांच्या कोम्बिंग आॅपरेशनदरम्यान नायजेरियन व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला केला. बंगळुरू येथून फरार असलेल्या नायजेरियन गुन्हेगाराच्या शोधात पोलिसांचे हे आॅपरेशन सुरू होते.

नायजेरियनचा पोलिसांवर हल्ला
नवी मुंबई : बोनकोडे येथे पोलिसांच्या कोम्बिंग आॅपरेशनदरम्यान नायजेरियन व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला केला. बंगळुरू येथून फरार असलेल्या नायजेरियन गुन्हेगाराच्या शोधात पोलिसांचे हे आॅपरेशन सुरू होते. या प्रकारात तीन पोलीस जखमी झाले असून, दोघा नायजेरियनना अटक करण्यात आली आहे.
बंगळुरू येथे गुन्ह्णाची नोंद असलेली नायजेरियन व्यक्ती बोनकोडे येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसारपोलिसांचे पथक गुन्हे शाखा पोलिसांना येवून भेटले होते. या पथकासोबत गुन्हे शाखा व कोपरखैरणे पोलिसांनी गुरुवारी रात्री बोनकोडे गाव येथे कोम्बिंग आॅपरेशन केले. रात्री ११ वाजल्यापासून मध्यरात्री २ वाजेपर्यंत ही मोहीम सुरु होती. यावेळी मद्यधुंद अवस्थेत असलेल्या नायजेरियननी पोलिसांवरच हल्ला केला. पारपत्र अधिनियमअंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना कोपरखैरणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
रुग्णालयातून
पण काढला पळ
नायजेरियन व्यक्तींची धरपकड सुरू असतानाच पोलिसांच्या तावडीतून पळ काढण्याच्या प्रयत्नात दोघे जखमी झाले होते. त्यांच्याच सहकाऱ्यांनी या दोघांना वाशीतील महापालिका रुग्णालयात दाखल केले होते. मात्र त्यांना ताब्यात घेण्यासाठी सकाळी पोलीस रुग्णालयात पोचले असता तिथूनही त्यांनी पळ काढला होता.
बंगळुरू पोलिसांना हवा असलेल्या गुन्हेगाराचा शोध घेण्यासाठी बोनकोडे गाव येथे नायजेरियन व्यक्तींचे कोम्बिंग आॅपरेशन होते. यावेळी व्हिजा संपलेला असतानाही राहणाऱ्या दोघांवर कारवाई करण्यात आली. कारवाईवेळी काही नायजेरियन व्यक्तींच्या समूहाने पोलिसांवर हल्ला केला. त्यामध्ये तीन पोलीस किरकोळ जखमी झाले आहेत.
- सुरेश मेंगडे, उपआयुक्त गुन्हे शाखा.