नायजेरियन नागरीकाची गळा चिरून हत्या

By Admin | Updated: March 7, 2016 02:14 IST2016-03-07T02:14:34+5:302016-03-07T02:14:34+5:30

वाढदिवसाची पार्टी रात्रभर साजरी केल्यानंतर सकाळी दारुच्या नशेत दोन नायजेरियन नागरीकांमध्ये वाद होऊन हाणामारी झाली.

Nigerian citizen's throat cut down | नायजेरियन नागरीकाची गळा चिरून हत्या

नायजेरियन नागरीकाची गळा चिरून हत्या

वसई : वाढदिवसाची पार्टी रात्रभर साजरी केल्यानंतर सकाळी दारुच्या नशेत दोन नायजेरियन नागरीकांमध्ये वाद होऊन हाणामारी झाली. त्यात एका तरुणाने बियरच्या बाटलीने दुसऱ्या इसमाचा गळा कापून हत्या केली. तुळींज पोलिसांनी आरोपीला लगेच अटक केली.
ही घटना सकाळी नऊच्या सुमारास महेश वेल्फेअर सोसायटीच्या दुसऱ्या मजल्यावरील एका खोलीमध्ये घडली. फरुमुु ओबीन मायकल (३२) असे मृताचे नाव असून चुकुम्वा मायकल नेवबू (२२) असे आरोपीचे नाव आहे. दोघे नायजेरियन असून एकाच खोलीत रहात होते. फरुमुु याचाच काल वाढदिवस होता. त्यामुळे रात्रभर मित्रांसोबत पार्टी करण्यात आली होती. सकाळी फरुमुु आणि चुकुम्वा दोघेच खोलीत होते. सकाळी पुन्हा दोघे दारु पित असतांना त्यावेळी दोघांमध्ये वाद झाला.
तो विकोपाला गेल्याने संतापलेल्या फरुमुु याने चुकुम्वा याला बियरची बाटली फेकून मारली. सावध चुकुम्वाने ती चुकवली आणि बाटली भिंंतीवर आदळून फुटली. त्यामुळे प्रचंड संतापलेल्या चुकुम्वाने फुटलेली बाटली घेऊन फरुमुुवर हल्ला केले व झालेल्या झटापटीत त्याचा गळा त्या फुटक्या बाटलीने चिरला.

Web Title: Nigerian citizen's throat cut down