कोकेनसह नायजेरियनला अटक, अमलीपदार्थविरोधी पथकाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 00:56 IST2017-12-17T00:55:51+5:302017-12-17T00:56:07+5:30
नवीन वर्षाच्या पार्टीच्या निमित्ताने अमलीपदार्थांची मागणी वाढत असल्याने पोलिसांनी त्यावर विशेष नजर ठेवली आहे. उत्तेजक द्रव्य, पदार्थांची तस्करी, विक्री करणा-यांवर कारवाई हाती घेतली आहे.

कोकेनसह नायजेरियनला अटक, अमलीपदार्थविरोधी पथकाची कारवाई
मुंबई : नवीन वर्षाच्या पार्टीच्या निमित्ताने अमलीपदार्थांची मागणी वाढत असल्याने पोलिसांनी त्यावर विशेष नजर ठेवली आहे. उत्तेजक द्रव्य, पदार्थांची तस्करी, विक्री करणा-यांवर कारवाई हाती घेतली आहे. याच कारवाईअंतर्गत वांद्रे येथील लोखंडवाला परिसरात एका नायजेरियन नागरिकाला अटक करून सहा लाख रुपये किमतीचे कोकेन जप्त करण्यात आले आहे. एजाज ओसी अँड्रेयू (४१, सध्या रा. मीरा रोड) असे त्याचे नाव असून उच्चभू्र वस्तीतील पुरुष, महाविद्यालयीन तरुणांच्या पार्टीमध्ये तो ड्रग पुरवित असे. अमलीपदार्थविरोधी पथकाने (एनएनसी) ही कारवाई केली.
अँड्रेयू हा लोखंडवाला परिसरात अमलीपदार्थांची विक्री करणा-या प्रमुख तस्करांपैकी एक आहे. त्याच्यावर ‘एनडीपीएस’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
बकुल चांदेरिया कनेक्शन?
‘एनएनसी’च्या ताब्यात असलेल्या सेलिब्रिटींना अमलीपदार्थांची विक्री करणारा बकुल चंदेरिया हा नायजेरियन टोळीककडून अमलीपदार्थ मिळवित असल्याची माहिती आहे. त्यानुसार अँड्रेयू आणि बकुलमध्ये काही संबंध आहेत का, या संबंधांबाबत चौकशी करण्यात येत असल्याचे उपायुक्त शिवदीप लांडे यांनी सांगितले.