राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईतील माजी गटनेते नियाज वणू यांचे निधन

By जयंत होवाळ | Updated: May 17, 2024 12:55 IST2024-05-17T12:55:33+5:302024-05-17T12:55:57+5:30

वणू हे अभ्यासू नगरसेवक म्हणून ओळखले जात. विविध नागरी समस्यांची त्यांना सखोल जाण होती.

Niaz Vanu, former group leader of NCP in Mumbai, passed away | राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईतील माजी गटनेते नियाज वणू यांचे निधन

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईतील माजी गटनेते नियाज वणू यांचे निधन

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई महापालिकेतील माजी गटनेते, माजी नगरसेवक नियाज वणू यांचे शुक्रवारी सकाळी नऊ वाजता मुंबईत निधन झाले. मागील काही दिवसांपासून ते रुग्णालयात दाखल होते. ते ७६ वर्षांचे होते. 

सन १९७८ सालापासून ते वडाळा ॲन्टाॅप हिल येथून अपक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून पालिकेत निवडून येत होते. १९७८,१९८५, १९९२, १९९७, २००७ साली पालिकेत ते निवडून आले होते. वणू हे अभ्यासू नगरसेवक म्हणून ओळखले जात. विविध नागरी समस्यांची त्यांना सखोल जाण होती.

पालिकेच्या १८८८ च्या कायद्याचा त्यांचा उत्तम अभ्यास होता. पालिका कायद्याच्या अचूक माहितीद्वारे ते सनदी अधिकाऱ्यांनाही पालिका सभागृहात चितपट करत.

Web Title: Niaz Vanu, former group leader of NCP in Mumbai, passed away