पुढची दिवाळी राम मंदिरात साजरी करणार - योगी आदित्यनाथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 01:33 IST2017-11-05T01:32:55+5:302017-11-05T01:33:02+5:30

पुढील दिवाळी राम मंदिरामध्ये साजरी करू, असे वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले. शनिवारी ते मुंबई दौ-यावर होते. तेव्हा ते बोलत होते.

Next Diwali will celebrate in Rama Temple - Yogi Adityanath | पुढची दिवाळी राम मंदिरात साजरी करणार - योगी आदित्यनाथ

पुढची दिवाळी राम मंदिरात साजरी करणार - योगी आदित्यनाथ

मुंबई : पुढील दिवाळी राम मंदिरामध्ये साजरी करू, असे वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले. शनिवारी ते मुंबई दौ-यावर होते. तेव्हा ते बोलत होते.
भाजपाचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी नुकत्याच व्यक्त केलेल्या वक्तव्याचे समर्थन योगी आदित्यनाथ यांनी केले. आदित्यनाथ म्हणाले की, दिवाळी सणाचा जन्मच अयोध्येमध्ये झाला होता.
रामाने १४ वर्षांचा वनवास आणि लंकेवर विजय मिळवल्यानंतर राम
परत अयोध्येत आले होते़ त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी अयोध्येतील जनतेने दिवाळी साजरी केली होती. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा लवकरच येईल आणि तो योग्य असाच असेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
आम्ही देवदेवतांचा सन्मानच करतो. परंतु हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने यावर जास्त बोलणे
उचित नाही, असे आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले.
न्यायालयात या प्रकरणाची जलद गतीने कार्यवाही सुरू असल्याने लवकरच निकाल अपेक्षित आहे. आणि तो आमच्या बाजूने लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Web Title: Next Diwali will celebrate in Rama Temple - Yogi Adityanath