वृत्तपत्र विक्रेत्याचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:08 IST2021-08-13T04:08:58+5:302021-08-13T04:08:58+5:30

मुंबई : बैंगनवाडी नवीन बस डेपो येथील वृत्तपत्र विक्रेते मोहम्मद मारुफ (६५) यांचे गुरुवारी पहाटे ४.१० वाजता अपघाती निधन ...

Newspaper seller dies | वृत्तपत्र विक्रेत्याचे निधन

वृत्तपत्र विक्रेत्याचे निधन

मुंबई : बैंगनवाडी नवीन बस डेपो येथील वृत्तपत्र विक्रेते मोहम्मद मारुफ (६५) यांचे गुरुवारी पहाटे ४.१० वाजता अपघाती निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी असे कुटुंब असून, त्यांच्या दु:खात मानखुर्द, गोवंडी येथील सगळे वृत्तपत्र विक्रेते आणि एजंट सहभागी आहेत.

मोहम्मद मारुफ हे गोवंडी येथील बैंगनवाडी, शिवाजीनगर येथे वास्तव्यास होते. गुरुवारी पहाटे चार वाजता घरून वृत्तपत्र घेण्यासाठी सायकलवरून मानखुर्दला येण्यासाठी निघाले. बैंगनवाडी सिग्नल, मानखुर्द-घाटकोपर लिंक रोड, रहमानिया मशीदसमोर एक अज्ञात भरधाव चारचाकी त्यांना ठोकर देऊन पसार झाली. घटनास्थळावर देवनार पोलीस ठाण्याचे अधिकारी दाखल झाल्यानंतर त्यांनी मोहम्मद यांना घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथे त्यांना मृत घोषित केले गेले.

Web Title: Newspaper seller dies